ठळक मुद्देतब्बल 22 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘सीआयडी’ ही मालिका 2018 मध्ये संपली. पण आता याचा दुसरा सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

वेबसीरिजचा दुसरा, तिसरा सीझन आता प्रेक्षकांसाठी सामान्य बाब झाली आहे. आता टीव्हीवरच्या मालिकांमध्येही सीझनचा ट्रेंड पाहायला मिळतोय. होय, येत्या काळात अनेक लोकप्रिय मालिकांचा दुसरा, तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हिंदीत हा ट्रेंड तसा फार नवा नाही. पण आता  हिंदीसोबत मराठी मालिकामध्येही हा ट्रेंड सुरु झाला आहे.
 

‘अग्गंबाई सुनबाई’

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’ आत्ता लवकरच ‘अग्गंबाई सुनबाई’ या रुपात परत येत आहे. झी मराठी वरील ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र चाहत्यांना नाराज होण्याचे कारण नाही. कारण आसावरी-अभिजीत आणि सोहम-शुभ्रा यांच्या संसाराचा पुढील प्रवास प्रेक्षकांना नव्या कथेत पाहायला मिळणार आहे. एकार्थाने याला ‘अग्गंबाई सासूबाई’चा दुसरा सीझन म्हणता येईल. ‘अग्गंबाई सूनबाई’ या नव्या नावाने नवी मालिका  15 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘रात्रीस खेळ चाले 3’

‘रात्रीस खेळ चाले’ ही गाजलेली लोकप्रीय मालिका. या मालिकेचा तिसरा सीझन लवकरच येतोय. भाग 1, 2 नंतर आता भाग 3 घेऊन ही मालिका झी मराठीवर पुनरागमन करत आहे. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसºया भागातील अनेक कलाकार या तिसºया भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसºया भागात एंट्री होणार आहे.

नवे लक्ष्य

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्य’ ही मालिका आठवत असेलच. खाकी वर्दीची ताकद दाखवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारी ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. आता यावर आधारित ‘नवे लक्ष्य’ ही मालिका नव्या चेहºयांसह टीव्हीवर पुनरागमन करत आहे.

वागले की दुनिया

‘वागले की दुनिया’ ही 90 च्या दशकातील हिंदी मालिका आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. आता ‘सब’वाहिनीवर हीच मालिका एका नव्याको-या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.   

सीआयडी

तब्बल 22 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘सीआयडी’ ही हिंदी मालिका 2018 मध्ये संपली. पण आता याचा दुसरा सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. होय, प्रेक्षकांच्या प्रेमाखातर ही मालिका परत एकदा छोट्यापडद्यावर पुनरागमन करणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: marathi serials comeback television Upcoming TV Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.