लतिका पडली अभिमन्युच्या प्रेमात; टळेल का त्यांचा घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 07:45 PM2021-10-25T19:45:00+5:302021-10-25T19:45:00+5:30

Sundara Manamadhe Bharli:गेल्या कित्येक दिवसांपासून अभिमन्यु आणि लतिका यांच्या नात्यात चढउतार येत आहेत. त्यामुळे हे दोघं लवकरच कायदेशीररित्या विभक्त होणार आहेत.

marathi serial Sundara Manamadhe Bharli atika fall in love with abhimanyu | लतिका पडली अभिमन्युच्या प्रेमात; टळेल का त्यांचा घटस्फोट?

लतिका पडली अभिमन्युच्या प्रेमात; टळेल का त्यांचा घटस्फोट?

googlenewsNext
ठळक मुद्देअभिमन्युला पाहिल्यावर लतिका सांगेल का तिच्या मनातील गोष्टी?

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली( sundara mann madhe bharli). उत्तम कथानक आणि त्याला कलाकारांच्या अभिनयाची जोड यामुळे ही मालिका अवघ्या काही भागांमध्येच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. सध्या या मालिकेत अनेक घटना घडताना पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिमन्यु आणि लतिका यांच्या नात्यात चढउतार येत आहेत. त्यामुळे हे दोघं लवकरच कायदेशीररित्या विभक्त होणार आहेत. मात्र, आता लतिकाच हळूहळू अभ्याच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. 

कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभ्या आणि लतिका एकमेकांना भेटणार आहेत. या दोघांची भेट झाल्यावर त्यांच्यात नेमकी काय चर्चा होणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं. तरीदेखील प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये लतिकाच्या मनातील भाव सांगण्यात आले आहेत.

लतिकाने जिरवला आमदाराच्या पोराचा माज; गावकऱ्यांसमोर काढाव्या लागल्या मिशा

अभिमन्यु, लतिकासमोर आल्यानंतर तिच्या मनात मोठी कालवाकालव झाल्याचं पाहायला मिळत आहे. लतिका नॉन स्टॉप स्वत:शीच मनात बोलत असून हा घटस्फोट नको असं अभ्याला सांगण्याच्या विचारात आहे. परंतु, अभ्याला समोर पाहिल्यावर त्याच्याशी काय बोलावं हे तिला सुचत नाही.

"आज सांगू का अभ्याला नको ती नोटीस, नको तो घटस्फोट.. आज किती देखणा दिसतोयेस तू. शांत डोळे, स्थिर वाटतोय एकदम...म्हणून का मी त्याला", असं लतिका तिच्या मनातल्या मनात बोलताना दिसत आहे.

दरम्यान, अभिमन्युला पाहिल्यावर लतिका तिच्या मनातील सगळ्या गोष्टी त्याला सांगणार का? अभिमन्युसमोर ती तिच्या प्रेमाची कबुली देणार का? आणि त्यांचा घटस्फोट थांबणार का हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं आहे. मात्र, या सगळ्याची उत्तर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतच प्रेक्षकांना मिळणार आहे. 
 

Web Title: marathi serial Sundara Manamadhe Bharli atika fall in love with abhimanyu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.