Hawa Mein Udati Jaaye! मुक्ता अन् प्रियाने दिला गाण्याला नवा ट्विस्ट; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 10:45 AM2021-12-09T10:45:00+5:302021-12-09T10:45:00+5:30

Ppriya bapat -mukha barve dance: प्रिया बापट अनेकदा सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. मात्र,यावेळी तिने तिच्यासोबत मुक्तालाही तिचा डान्स पार्टनर केलं आहे.

marathi actress priya bapat and mukha barve Hawa Mein Udati Jaaye dance video viral | Hawa Mein Udati Jaaye! मुक्ता अन् प्रियाने दिला गाण्याला नवा ट्विस्ट; पाहा Video

Hawa Mein Udati Jaaye! मुक्ता अन् प्रियाने दिला गाण्याला नवा ट्विस्ट; पाहा Video

googlenewsNext

 मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे (mukta barve)आणि प्रिया बापट (priya bapat). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर या दोन्ही अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे या दोघींची एकमेकींसोबत छान मैत्री असून अनेकदा त्या एकमेकींसोबतचे काही फोटो, व्हिडीओज शेअर करत असतात. यावेळीदेखील त्यांनी असाच एक डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या मुक्ता बर्वेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रिया बापटसोबत हवा मी उडती जाए या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे या दोघींनीही नव्या हटके डान्स करत या गाण्याला एक वेगळा टच दिला आहे. 

प्रिया बापट अनेकदा सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. मात्र,यावेळी तिने तिच्यासोबत मुक्तालाही तिचा डान्स पार्टनर केलं आहे. या दोघींचा हा भन्नाट व्हिडीओ अभिनेता उमेश कामतने शूट केला आहे.

Video: प्रिया-उमेशचा विकेंड मूड; Lazy Lad वर केला भन्नाट डान्स

दरम्यान, प्रिया आणि मुक्ता यांनी 'आम्ही दोघी' या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. तसंच अलिकडे प्रियाने मुक्ताची मुख्य भूमिका असलेल्या 'अजुनही बरसात आहे' या मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

Web Title: marathi actress priya bapat and mukha barve Hawa Mein Udati Jaaye dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.