स्तवन शिंदे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:43 AM2021-10-25T11:43:15+5:302021-10-25T11:46:50+5:30

'जय भवानी जय शिवाजी मालिकेत' जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता स्तवन शिंदे सज्ज झाला आहे.

Marathi Actor Satvan Shinde in Jai Bhavani Jai Shivaji series,Know More About his Role | स्तवन शिंदे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा

स्तवन शिंदे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा

googlenewsNext

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत शिवा काशिद यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. अभिनेता स्तवन शिंदे या मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे.

शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान. शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असं म्हण्टलं जातं. महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचं सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. याच जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता स्तवन शिंदे सज्ज झाला आहे.

जय भवानी जय शिवाजी मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिनेता स्तवन म्हणाला, ‘तुमचं आमचं सेम असतं' आणि 'अग्निहोत्र २' या मालिकेत रसिकांनी मला पाहिलंच आहे. आता 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेच्या निमित्ताने पुन्हा जोडला जातोय याचा आनंद आहे. शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकलं आहे. 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे. मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. मी लहानपणी घोडेस्वारी शिकलो आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना त्याचा नक्कीच उपयोग होईल. यासोबतच काही ऐतिहासिक पुस्तकांचं वाचन करत आहे अशी भावना स्तवन शिंदे याने व्यक्त केलीय.’

Web Title: Marathi Actor Satvan Shinde in Jai Bhavani Jai Shivaji series,Know More About his Role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.