गणपतीच्या अतिशय सुरेख आणि सुबक पर्यावरणप्रेमी मूर्ती बनविणाऱ्या ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’च्या अंध विद्यार्थ्यांनी ‘नच बलिये’च्या मंचावर उपस्थिती लावली होती. यावेळी या मुलांनी स्पर्धक आणि परीक्षकांशी संवाद साधला. या मुलांची चर्चा केल्यावर सर्व परीक्षकही सुखावले.

आपण गणपतीची मूर्ती कशी बनवितो आणि रंगवितो, याची माहिती यावेळी ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’च्या सदस्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना दिली. मात्र हे विद्यार्थी वेगवेगळे रंग पाहू शकत नसल्याने प्रत्येक रंग ओळखण्यासाठी आपल्याला प्रत्येक रंगात एक विशिष्ट सुवास टाकावा लागतो, अशी माहिती एका सदस्याने देताच परीक्षक रवीना टंडन आणि काही जणांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.

या अंध सदस्यांशी गप्पा झाल्यावर मंचावर किंवा सेटवर अशी एकही व्यक्ती नव्हती, जिचे डोळे ओले झाले नाहीत. दृष्टीसारखा जीवनाचा महत्त्वाचा पैलूच नसतानाही त्यावर मात करणाऱ्या या सदस्यांना पाहून सर्वच जण भावनावश झाले होते. यावेळी आणखी एक घटना घडली. या सदस्यांची स्थिती पाहून अनेक स्टारनी त्यांना आपापल्या परीने मदत करण्यासाठी तात्काळ पावले उचलली. 


एरवी सर्वांना खळाळून हसविणारा कार्यक्रमाचा सूत्रसंचालक मनीष पॉलने या ट्रस्टला स्वत:तर्फे ५१ हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी अन्य परीक्षक आणि इतर स्पर्धक जोड्यांनीही त्यांना आपला पाठिंबा दर्शविला. एक स्पर्धक प्रिन्स नरुलाने खास आपल्या शैलीत या ट्रस्टला तब्बल एक लाखांची देणगी दिली. यावेळी सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा एकच गजर होत असल्याने वातावरणात सर्वत्र चैतन्यदायक आनंद भरला होता. भावनावश झालेल्या रवीना टंडनने
सांगितले, “आपल्या जीवनात हे प्रचंड मोठं आव्हान स्वीकारूनही ही मुलं गणपतीच्या इतक्या सुरेख मूर्ती बनवीत आहेत. ही कामगिरी आमच्यासारख्या दृष्टी असलेल्यांनाही करणं कधी कधी जमणार नाही!”


हा एपिसोड येत्या शनिवार-रविवारच्या भागात ‘नच बलिये-९’मध्ये रात्री ८ वाजता स्टार प्लसवर पहायला मिळणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maniesh Paul and Prince Narula donates visually challenged children's Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.