Manasi Parekh Gohil turns producer; dons a dual role of actor and producer for 'do not disturb' | अभिनयानंतर मानसी करतेय 'या' क्षेत्रात पदार्पण
अभिनयानंतर मानसी करतेय 'या' क्षेत्रात पदार्पण

अभिनेत्री, गायिका, रंगमंच कलाकार आणि एक आई अशा अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडणारी मानसी पारेख गोहिल आता आणखी एक क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. मानसी आता 'डू नॉट डिस्टर्ब' या तिच्या आगामी एमएक्स एक्स्लुझिव्ह वेब सिरीजमधून निर्माती म्हणून या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अहमदाबादी प्रसिद्ध अभिनेता मल्हार ठाकर याच्यासोबत ती यात दिसणार असून एमएक्स प्लेअरवर हा कॉमेडी ड्रामा सुरू होत आहे.

लव्ह नी भावई फेम दिग्दर्शक संदीप पटेल यांनी या शोमध्ये गुजराती जोडप्याचे वैवाहिक जीवन अत्यंत सुंदरपणे दाखवले आहे. बेडरूमच्या बंद दाराआडचे त्यांचे संवाद, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठीची त्यांची धडपड 'डू नॉट डिस्टर्ब' ही प्रत्येक जोडप्याची कथा असून एकमेकांच्या कुटुंबियांशी असलेले त्यांचे नाते, त्यांच्या अयशस्वी झालेल्या ट्रीप्स, डिनरचे प्लान्स आणि प्रेमासाठी त्यांनी केलेले त्याग हे सगळे प्रसंग त्यांच्या बेडरूमच्या कीहोलमधून दाखवण्यात आले आहेत.


 
मानसी म्हणाली, ''सगळ्या टीमला एकत्र बांधून ठेवणे माझ्यासाठी फारच मजेशीर होते. कारण, मी या शोमध्ये अभिनेत्री व निर्माती या दोन्ही भूमिका निभावते आहे. हा प्रकल्प खूपच छान झाला आहे आणि त्याचबरोबर हे आव्हानही होते. नव्या शहरात यापूर्वी मी कधीही काम केले नव्हते, अशा माणसांसोबत मी काम करत होते. पण मजा आली. संदीप पटेल (गुजराती निर्माते) यांनी या शोचे दिग्दर्शन केले असून मिताई आणि नेहल या दोघींनी ही कथा लिहिली आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक गुजराती सुपरहीट चित्रपट दिले असून मल्हार ठाकर हे तर गुजराती सिनेमांमध्ये आज मोठे नाव आहे. दर्जाच्या बाबतीत आमची ही सगळी टीम
उत्‍तम दर्जाची आहे, याचा मला अभिमान आहे.''


Web Title: Manasi Parekh Gohil turns producer; dons a dual role of actor and producer for 'do not disturb'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.