Video: 'मन झालं बाजिंद': कृष्णा -रायाचा भन्नाट डान्स; 'बुरुम बुरुम' गाण्यावर धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:30 AM2021-12-02T11:30:00+5:302021-12-02T11:30:00+5:30

Man zal bajinad: सध्या राया आणि कृष्णाचा असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी भन्नाट डान्स करतांना दिसत आहे.

man zal bajinad fame raya and krishna doing dance pandu movie song bhurum bhurum | Video: 'मन झालं बाजिंद': कृष्णा -रायाचा भन्नाट डान्स; 'बुरुम बुरुम' गाण्यावर धरला ताल

Video: 'मन झालं बाजिंद': कृष्णा -रायाचा भन्नाट डान्स; 'बुरुम बुरुम' गाण्यावर धरला ताल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद'. सध्या या मालिकेत अनेक रंजकदार वळण येत आहेत. सुरुवातीच्या काळात एकमेकांशी जराही न पटणारी राया-कृष्णाची जोडी आता हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ऑनस्क्रीन एकमेकांच्या प्रेमात पडणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीन चांगली मैत्री आहे. त्यामुळे अनेकदा ते सेटवर मज्जा मस्ती करत असतात. यात अनेकदा ते सेटवरचे काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या राया आणि कृष्णाचा असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी भन्नाट डान्स करतांना दिसत आहे.

राया आणि कृष्णा या दोघांनी सध्या गाजत असलेल्या पांडू चित्रपटातील एका गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे हे दोघंही पांडू चित्रपटातील गाणं एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांचा हा भन्नाट डान्स व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राया-कृष्णाने पांडू चित्रपटातील ‘बुरुम बुरुम’ या गाण्यावर ताल धरला आहे. उडत्या चालीचं हे गाणं प्रेक्षकांना विशेष आवडत असून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे.

दरम्यान,  'पांडू' या चित्रपटात एकूण ५ गाणी आहेत. मात्र, त्यातील ‘बुरुम बुरुम’ या गाण्याला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत आहे. हे गाणं अवधूत गुप्तेने लिहीलं असून आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलं आहे.

Web Title: man zal bajinad fame raya and krishna doing dance pandu movie song bhurum bhurum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.