मेकअपशिवाय देखील अनिता दाते दिसते तितकीच सुंदर, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:48 PM2021-02-20T16:48:40+5:302021-02-20T16:51:48+5:30

अनिताने शेअर केलेल्या या फोटोत ती झोपेतून नुकतीच उठलेली दिसत आहे. तिने या फोटोद्वारे तिच्या चाहत्यांना गुड मॉर्निंग केले आहे.

Majhya Navryachi Bayko anita date without makeup picture | मेकअपशिवाय देखील अनिता दाते दिसते तितकीच सुंदर, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

मेकअपशिवाय देखील अनिता दाते दिसते तितकीच सुंदर, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देया फोटो़त अनिताने अजिबातच मेकअप केलेला नाहीये. पण तरीही अनिता खूपच छान दिसत आहे. अनिताचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 

माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना मालिकेच्या चित्रीकरणाविषयी माहिती देत असते. नुकतेच अनिताने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिचा लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

अनिताने शेअर केलेल्या या फोटोत ती झोपेतून नुकतीच उठलेली दिसत आहे. तिने या फोटोद्वारे तिच्या चाहत्यांना गुड मॉर्निंग केले आहे. तिच्या या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या फोटो़त तिने अजिबातच मेकअप केलेला नाहीये. पण तरीही अनिता खूपच छान दिसत आहे. अनिताचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत अनिता दाते आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतील तिची भूमिका, तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या मालिकेमुळे अनिता प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर तिने हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत काम केले होते. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. तिचे काका उपेंद्र दाते हे नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

Web Title: Majhya Navryachi Bayko anita date without makeup picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.