माही विजच्या भावाचे कोरोनामुळे निधन; शेअर केली भावुक पोस्ट, सोनू सूदचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 11:25 AM2021-06-08T11:25:27+5:302021-06-08T11:27:14+5:30

माही विजवर कोसळला दु:खाचा डोंगर; भाऊ बरा होऊन घरी परतेल, अशी अपेक्षा माहीला होती. पण 1 जूनला त्याच्या निधनाचीच बातमी तिला मिळाली.  

mahhi vij brother dies due to corona writes emotional post and thanks sonu sood for help in treatment | माही विजच्या भावाचे कोरोनामुळे निधन; शेअर केली भावुक पोस्ट, सोनू सूदचे मानले आभार

माही विजच्या भावाचे कोरोनामुळे निधन; शेअर केली भावुक पोस्ट, सोनू सूदचे मानले आभार

googlenewsNext
ठळक मुद्देतीन दिवसांपूर्वी माहिीने भावाचा एक फोटो शेअर करत, अशीच एक भावुक पोस्ट शेअर केली होती.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे माहीने तिच्या लहान भावाला गमावले. भाऊ बरा होऊन घरी परतेल, अशी अपेक्षा माहीला होती. पण 1 जूनला त्याच्या निधनाचीच बातमी तिला मिळाली.  (Mahhi Vij brother death due to corona)
माहीने आता एक भावुक पोस्ट शेअर करत भावाच्या निधनाची माहिती दिली आहे. सोबत भाऊ  रूग्णालयात असताना मदत केल्याबद्दल अभिनेता सोनू सूदचे (Sonu Sood) आभार मानले आहेत.

माहीने लिहिले, ‘माझ्या भावाला रूग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी आभारी आहे सोनू सर. मी खचले होते. अशात तुम्ही मला लढण्याचे बळ दिले, आशा दाखवली. माझा भाऊ बरा होऊन घरी परत येईल, अशी आशा मला होती. पण कदाचित तुम्हाला सत्य माहित होते. तुम्ही लोकांच्या मदत करत आहात. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो लोकांना हिंमत आणि सकारात्मकता देण्यासाठीही मी तुमचे आभार आहे.’ आपल्या पोस्टमध्ये माहीने भारती सिंहचेही आभार मानले आहेत. भारती, तू रोज माझ्या भावाची काळजीने चौकशी करायचीस. व्हिडीओद्वारे मला पॉझिटीव्ह राहण्याची हिंमत द्यायचीस, तुझेही आभार, असेही तिने लिहिले आहे.
माहीने तिच्या पोस्टमध्ये सोनू सूदचे एक ट्वीटही टॅग केले आहे. सोनूने त्यात लिहिलेय, एक 25 वर्षांचा मुलगा, ज्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. तो जगेल याची शक्यता फार कमी होती. पण तरीही मी रोज डॉक्टरांशी बोलायचो. मात्र हे त्याच्या कुटुंबाला सांगण्याची कधीच हिंमत झाली नाही.

तीन दिवसांपूर्वी माहिीने भावाचा एक फोटो शेअर करत, अशीच एक भावुक पोस्ट शेअर केली होती. ‘मी तुला गमावले नाही तर मिळवले आहे. तू माझी ताकद आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि करत राहिल भाई. काश, मी काही दिवस मागे जाऊन तुला घट्ट मिठी मारू शकले असते आणि तुला कधीच जाऊ दिले नसते... आम्ही तुझ्यावर खूप पे्रम करतो, पण कदाचित परमेश्वर तुझ्यावर आमच्यापेक्षा खूप अधिक प्रेम करत असावा. तू नेहमी माझा हिरो असशील....,’ असे तिने लिहिले होते.

Web Title: mahhi vij brother dies due to corona writes emotional post and thanks sonu sood for help in treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.