Mahendra to flee away after acquiring Mahendra's shop on Sony SAB's Bhakharwadi | 'भाकरवडी'मध्‍ये अण्‍णाचे दुकान बळकवणार महेंद्र

'भाकरवडी'मध्‍ये अण्‍णाचे दुकान बळकवणार महेंद्र


सोनी सबवरील अत्‍यंत लोकप्रिय मालिका 'भाकरवडी' दोन कुटुंबांमधील प्रेम-द्वेष नात्‍याच्‍या सादरीकरणासह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अण्‍णा (देवेन भोजानी) त्‍याचे दुकान गमावत असताना महेंद्र (परेश गनात्रा) त्‍याच्‍या मदतीसाठी धावून येतो. पण महेंद्र अण्‍णाकडून त्‍याचे 'गोखले बंधू' दुकान स्‍वत:च्‍या नावावर करून घेतो आणि अण्‍णाच्‍या नकळत महेंद्र दूर पळून जातो. 

अण्‍णा अखेर महेंद्र ठक्‍करवर विश्‍वास ठेवतो आणि आपले दुकान त्‍याला देतो. पण महेंद्र दुकान कशाप्रकारे चालवेल, याबाबत अण्‍णाला काळजी असते. उर्मिला अण्‍णाला खात्री देते की, त्‍यांच्‍या सांगण्‍याप्रमाणेच दुकानाची कामे चालतील आणि त्‍यांनी बनवलेल्‍या भाकरवड्यांचीच विक्री केली जाईल. अण्‍णा तिच्‍या शब्‍दांवर विश्‍वास ठेवतो आणि समुदायासोबत स्‍नेह संमेलन साजरा करण्‍याची तयारी करतो. अण्‍णा या स्‍नेह संमेलनाच्‍या तयारीमध्‍ये व्‍यस्‍त असताना केशव त्‍याच्‍याकडे वाईट बातमी घेऊन येतो. केशव सांगतो की, महेंद्र गोखले बंधू दुकान आणि स्‍वत:च्‍या घराला आपले कुलूप लावून दूर पळून गेला आहे. ही बातमी ऐकून अण्‍णाला धक्‍काच बसतो. 
अण्‍णाची भूमिका साकारणारा देवेन भोजानी म्‍हणाला, ''अण्‍णा त्‍याचे दुकान व त्‍याचे कुटुंब वाचवण्‍यासाठी काय करावे या पेचप्रसंगात सापडला आहे. तो त्‍याचा शेजारी महेंद्रवर विश्‍वास ठेवतो. त्‍याला धक्‍कादायक बातमी मिळते की, महेंद्रने दुकान व त्‍याच्‍या घराला कुलूप लावले आहे आणि तो दूर पळून गेला आहे. पण महेंद्र अण्‍णाला फोन करून एक बातमी सांगतो, जे पाहताना प्रेक्षकांना अचंबित करणारे सत्‍य कळणार आहे.''
महेंद्रची भूमिका साकारणारा परेश गनात्रा म्‍हणाला, ''हा आगामी एपिसोड गोखले कुटुंब व आमच्‍या प्रेक्षकांसाठी भरपूर सरप्राईजेसनी भरलेला असेल. महेंद्र काहीतरी धक्‍कादायक गोष्‍टीचा उलगडा करणार आहे.''

Web Title: Mahendra to flee away after acquiring Mahendra's shop on Sony SAB's Bhakharwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.