Mahabharat : इन्स्टाग्रामवर अवतरले ‘भगवान कृष्ण’; म्हणे, हा तर चमत्कार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 01:21 PM2020-04-03T13:21:03+5:302020-04-03T13:23:15+5:30

महाभारताच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

mahabharat sri krishna actor nitish bharadwaj makes instagram debut and share a video goes viral-ram | Mahabharat : इन्स्टाग्रामवर अवतरले ‘भगवान कृष्ण’; म्हणे, हा तर चमत्कार!!

Mahabharat : इन्स्टाग्रामवर अवतरले ‘भगवान कृष्ण’; म्हणे, हा तर चमत्कार!!

googlenewsNext
ठळक मुद्देकृष्णाची नाही तर ऑफर झाली होती विदुराची  भूमिका

लॉकडाऊनमुळे रामायण, महाभारत, शक्तिमानसारखे 80 च्या दशकातील अनेक लोकप्रिय मालिका पुन्हा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. या मालिकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. रामायण ही मालिका तर टीआरपी चार्टमध्ये अव्वल आहे. बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ या मालिकेनेही प्रेक्षकांवर जादू केली आहे. आता महाभारताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, महाभारतात प्रभू कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. आपल्या डेब्यूसोबतच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची खासियत काय तर, यात नितीश यांनी एका चमत्काराबद्दल सांगितले आहे.

होय, नितीश यांनी नुकताच महाभारताशी संबंधित एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आत्तापर्यंत 35 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि सुमारे 12 लाख लोकांपर्यंत तो पोहोचला. आपल्या या व्हिडीओला ‘ऑनलाईन फॅमिली’ने दिलेला हा प्रतिसाद कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे नितीश यांनी म्हटले आहे. याचसोबत मी लवकरच ट्विटर आणि युट्यूबवर येणार असल्याची बातमी त्यांनी दिली आहे.
इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडीओत नितीश म्हणतात, ‘ अनेक लोक मला कृष्ण मानतात. पण मी कुठलाही देव नाही. माझ्या मते, देव प्रत्येकाच्या आत असतो़ फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे.

कृष्णाची नाही तर ऑफर झाली होती विदुराची  भूमिका

महाभारत या मालिकेने नितीश भारद्वाज यांना एक वेगळी ओळख दिली. पण खरे तर नितीश यांना आधी कृष्णाची नाही तर विदुराची भूमिका ऑफर झाली होती. त्यांनी स्वत: एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. महाभारतातील विदुराच्या भूमिकेसाठी मला ऑडिशनसाठी बोलण्यात आले होते. पण त्यावेळी मी जेमतेम 24 वर्षांचा होता. कमी वयामुळे रवी चोप्रा यांनी मला विदुराची नाही तर भगवान कृष्णाची भूमिका दिली आणि या भूमिकेने माझे आयुष्य बदलले, असे नितीश यांनी या मुलाखतीत सांगितले होते.

Web Title: mahabharat sri krishna actor nitish bharadwaj makes instagram debut and share a video goes viral-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.