“Madhuri has been an inspiration to me,'' Says Juhi Chawla | पहिल्यांदाच माधुरी दीक्षित आणि जुही चावला झळकणार छोट्या पडद्यावर
पहिल्यांदाच माधुरी दीक्षित आणि जुही चावला झळकणार छोट्या पडद्यावर

एक धकधक गर्ल तर दुसरी चुलबुली... नव्वदचं दशक या दोघींच्या नावावर राहिलं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.  दोघींनी नव्वदच्या दशकात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पहिल्यांदाच दोघी 'गुलाबी गँग' सिनेमातून रूपेरी पडद्यावर एकत्र झळकल्या. त्यानंतर या दोघे एकत्र सिनेमा तर सोडाच कोणत्या कार्यक्रमातही दिसल्या नाहीत.  रसिकांच्या मनावर गारुड घालणारी माधुरी आणि जुही ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे.

माधुरी आणि जुही सिनेमात नाहीतर छोट्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. डान्स दिवानेच्या सेटवर दोघींनी हजेरी लावली होती. दोघेही एकत्र आल्या म्हटल्यावर खास रसिकांच्या विनंतीमुळे त्यांनी त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर डान्सही केला. ''घुंगट के आड में''. आणि ''एक दो तीन'' या गाण्यांवर डान्स करत सा-यांनाच मंत्रमुग्ध केले होते. यावेळी दोघींनीही आपापल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. माधुरी सोबत मंचावर डान्स करण्यात माझा गौरवच आहे. मला नेहमीच तिचे कौतुक वाटते आणि तिच्यामुळे मला खूप प्रेरणा मिळते आहे. असे जुहीने सांगितले.

तर माधुरी दीक्षितने सांगितले की,“मला नेहमीच जुहीचे कौतुक वाटले आहे आणि तिचे कॉमिक टायमिंग असे आहे की मला ते शिकण्याची इच्छा आहे. गुलाब गँग केल्यानंतर मला पुन्हा तिच्या सोबत काम करण्याची इच्छा असल्याचे यावेळी तिने सांगितले”. तुर्तास येत्या भागात दोघींना एकत्र टीव्हीवर पाहणे रसिकांसाठी  दोघींच्या फॅन्ससाठी पर्वणी असणार आहे..
 

Web Title: “Madhuri has been an inspiration to me,'' Says Juhi Chawla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.