Life After Bigg Boss 11: कंट्रोवर्सी क्वीन अर्शी खानचा बदलला लूक,अजूनही मोठ्या संधीच्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 10:53 AM2018-09-29T10:53:50+5:302018-09-30T06:00:00+5:30

हे फोटो पाहून ती हिच अर्शी खान असा प्रश्न पडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही.

Life After Bigg Boss 11: Controversy Queen Arshi Khan changed Look, Still waiting for big opportunity | Life After Bigg Boss 11: कंट्रोवर्सी क्वीन अर्शी खानचा बदलला लूक,अजूनही मोठ्या संधीच्या प्रतिक्षेत

Life After Bigg Boss 11: कंट्रोवर्सी क्वीन अर्शी खानचा बदलला लूक,अजूनही मोठ्या संधीच्या प्रतिक्षेत

googlenewsNext

मेकओव्हर केल्यानं कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण मेकओव्हर केल्यानंतर लगेचच कामाचा बडा प्रोजेक्ट हाती लागला तर सोने पे सुहागाच. हे समिकरण आता पक्क होत चाललं आहे. म्हणूनच की काय  बिग बॉस या रिअॅलिटी शोची एक्स कंटेस्टंट अर्शी खानने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. 

 

 

मेकओव्हरमुळे तिचे नशीबाचे दरवाजे उघडतील असे कदाचित तिला वाटत असावे.पण तसेही एरव्ही फारशी कोणाली माहिती नसलेली अर्शी खानचे बिग बॉसमुळे नशीब पालटले आहे हे मात्र नक्की. बिग बॉस शोमध्ये असताना तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे आणि एकच हेअर स्टाइलमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल व्हायची. मात्र या झगमगत्या दुनियेत टिकून राहायचे असेल तर मेकओव्हशिवाय पर्याय नाही. म्हणूनच तिने आता स्वतःत बदल करत नव्या अवातारात ती पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो पाहून ती हिच अर्शी खान असा प्रश्न पडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही.

गेल्या काही महिन्यांपासून अर्शी आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. बिग बॉसमुळे अर्शी खानला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला. बिग बॉस शो नंतर प्रकाशझोतात आलेली अर्शी खानला जरी मोठे प्रोजेक्ट मिळत नसले तरीही अनेक फॅशन ब्रँडसाठी ती रॅम्पवॉक आणि फोटोशूटच्या ऑफर तिला मिळत असतात.

अर्शी खान प्रमाणे आणखीन एका कंटेस्टंटला चक्क मेकओव्हरमुळे सिनेमाची लॉटरीच लागली आहे. होय, लोकेश कुमार असे तिचे नाव आहे. बिग बॉस 11 या सिझनमध्ये कॉमनर स्पर्धक म्हणून ती झळकली होती. मेकओव्हरमुळे तिचे नशीबाचे दरवाजे उघडले आहेत असं म्हटल्यास असं वावगं ठरु नये. मेकओव्हरमुळे दक्षिणेतील बडा प्रोजेक्ट तिच्या हाती लागला आहे. तमिळ सिनेमाची ऑफर लोकेशला मिळाली आहे. मेकओव्हरसह तिने आपलं नावसुद्धा बदललं आहे. तिने आपलं नाव आता लोवी शरना असं केले आहे. याच नावाने आपली ओळख निर्माण व्हावी अशी तिची इच्छा आहे. 

Web Title: Life After Bigg Boss 11: Controversy Queen Arshi Khan changed Look, Still waiting for big opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.