Latika and Abhimanyu wedding in 'Sundara Manamadhye Bharli', series on interesting twists and turns! | 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका रंजक वळणावर, लतिका आणि अभिमन्यूची जुळणार रेशीमगाठ!

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका रंजक वळणावर, लतिका आणि अभिमन्यूची जुळणार रेशीमगाठ!

सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना असते. सौंदर्याची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते. याचविषयाला धरून कलर्स मराठीने सुंदरा मनामध्ये भरली ही एक आगळी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली. आता ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे.

आपण समाजात बघतो की, थोड्या स्थूल असणाऱ्या मुलीला 'नकार' देणारे तिच्या मनाचे सौंदर्य, तिच्यातील इतर गुणांची दखल घेत नाहीत. अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’. आपल्या मालिकेतील सुंदराला देखील अश्याच नकारांना सामोरी जावे लागले. पण बघता बघता तिला सज्जनरावांकडून लग्नासाठी होकार आला. लतीच्या घरामध्ये लगीनघाई सुरू झाली. या लग्नात अनेक विघ्न देखील आले. पण आलेली सगळी विघ्नं दूर करत शेवटी तो दिवस आला. पैशांच्या झालेल्या गडबडीमुळे सज्जन आणि त्याच्या घरच्यांनी लग्नाच्या दिवशी नकार दिला आणि लतिकाला मंडपात सोडून निघून गेले.

मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. हा सगळा झालेला प्रकार लतिकाच्या वडिलांसाठी सहन करणं अशक्य होऊन बसले आहे. त्यांची ही स्थिती बघता अभिमन्युचे वडिल एक निर्णय घेतात की लतिकाचे लग्न अभिमन्युशी होणार आहे. जोडीदाराविषयी आपली काही स्वप्न असतात अगदी तशीच लतिकाची आणि अभिमन्यूची आहेत. पण, अभिमन्युची ही स्वप्न मात्र स्वप्नच रहाणार आहेत कारण आता त्याला लतिकाशी लग्न करण्यावाचून कोणताही पर्याय नाही. कसा पार पडेल हा लग्नसोहळा ? अभि लतिची लग्न करण्यास होकार का देईल ? लग्नानंतरचा लति आणि अभिचा प्रवास कसा असेल ? हे दोघे सुखी संसार करू शकतील ? तिच्या मनाचं सौंदर्य, फिटनेसचं अतोनात वेड असलेल्या बालमित्राने कधीच पाहिलं नाही पण तिच्या नवर्‍याला ते दिसेल ? लग्न विशेष भाग १६ ऑक्टोबर रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर पहायला मिळणारआहे.

नियतीचा खेळ काही असा की, अभिमन्यु आणि लतिकासमोर एकमेकांशी लग्न करण्याची वेळ येणार आहे. बापूंसाठी लतिका लग्नास तयार झाली आहे... पण आता अभिमन्यु मंडपात येईल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Latika and Abhimanyu wedding in 'Sundara Manamadhye Bharli', series on interesting twists and turns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.