'पवित्र रिश्ता' मालिकेतील शेवटचा सीन सोशल मीडियावर होतोय व्हायरल, असे भेटले होते मानव-अर्चना

By तेजल गावडे | Published: October 5, 2020 04:29 PM2020-10-05T16:29:58+5:302020-10-05T16:30:41+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणीमध्ये जुना व्हिडिओ शेअर करत आहेत. आता पवित्र रिश्ता मालिकेतील सुशांत व अंकिताच्या शेवटच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

The last scene of 'Pavitra Rishta' series is going viral on social media. | 'पवित्र रिश्ता' मालिकेतील शेवटचा सीन सोशल मीडियावर होतोय व्हायरल, असे भेटले होते मानव-अर्चना

'पवित्र रिश्ता' मालिकेतील शेवटचा सीन सोशल मीडियावर होतोय व्हायरल, असे भेटले होते मानव-अर्चना

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे बरेच जुने व्हिडिओ चाहते शेअर करत आहेत. सुशांतला ओळख मालिका पवित्र रिश्तामधून मिळाली होती. याच मालिकेच्या सेटवर तो आणि अंकिता लोखंडेमध्ये प्रेमात पडले होते. आता याच मालिकेतील सुशांत आणि अंकिताचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पवित्र रिश्ता मालिकेत सुशांत व अंकिताच्या शेवटच्या भेटीचा आहे. या मालिकेत सुशांतने मानवची भूमिका केली होती. तर अंकिताने अर्चनाची भूमिका केली होती. पवित्र रिश्ताच्या शेवटच्या सीनमध्ये दाखवले गेले होते की मेल्यानंतरही मानव-अर्चना एकमेकांची साथ सोडत नाही. तसेच ते एकमेकांना वचन दतेता की प्रत्येक जन्मी एकमेकांना साथ देणार. पवित्र रिश्ताचा हा सीन पाहून चाहते खूप इमोशनल झाले आहेत आणि त्यांचे म्हणणे आहे की, सुशांतसारखे कुणी नव्हेत आणि कुणीच नसणार.


सुशांत सिंग राजपूतने २००९ ते २०११ सालापर्यंत पवित्र रिश्ता मालिकेत काम केले होते. या मालिकेच्या सेटवरच अंकिता लोखंडे व त्याची लव्हस्टोरी सुरू झाली होती. कित्येक वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. २०१६ साली त्यांचे ब्रेकअप झाले.

मागील जून महिन्यात एकता कपूरच्या या मालिकेला ११ वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने एकता कपूरने पवित्र रिश्ताच्या टीमचे कौतूकही केले होते. या पोस्टवर सुशांत सिंग राजपूतची प्रतिक्रियादेखील आली होती.

Web Title: The last scene of 'Pavitra Rishta' series is going viral on social media.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.