Lakshmi will return to Arvitai, complete the 300-odd section of 'Lakshmi Sadhan Manangalam' | लक्ष्मीची आर्वीताई परतणार, 'लक्ष्मी सदैव मंगलम'चे ३०० भाग पूर्ण
लक्ष्मीची आर्वीताई परतणार, 'लक्ष्मी सदैव मंगलम'चे ३०० भाग पूर्ण

लक्ष्मी सदैव मंगलम मालिका लवकरच ३०० भाग पूर्ण करणार आहे आणि या टप्प्यावर आता मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे.

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये सगळ्यांची लाडकी आर्वी म्हणजेच सुरभी हांडे लवकरच परत येणार आहे. तिच्या येण्याने लक्ष्मीच्या आयुष्याला कोणते वळण मिळणार अशा चर्चा काही महिन्यापासून रंगत होत्या, याविषयी चर्चा होत होत्या. हे सगळे होत असताना एकीकडे मल्हार घरामध्ये कोणती अनोळखी मुलगी इतक्या दिवसांपासून फोन करते आहे हे शोधण्याच्या प्रयत्नात आहे.

यावेळेस तो आर्वीचा फोटोदेखील दाखवतो आणि कदाचित ती मुलगी आर्वीची आहे हे कळल्यावर मल्हार खूप अस्वस्थ होतो जर आर्वी परत आली तर त्याचे आणि लक्ष्मीचे लग्न कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे मल्हार घरच्यांना सांगण्याचा निर्णय घेतो की, त्याला लक्ष्मीसोबत लग्न करायचे आहे. हे सांगत असतानाच आर्वी परत येणार आहे. 


आर्वीच्या परत येण्याने लक्ष्मीच्या आयुष्याला कुठली कलाटणी मिळेल ? आणि मल्हार कुठला निर्णय घेईल ? आर्वीच्या मनात नक्की काय आहे ? तिच्या अचानक गायब होण्यामागे कोणाचा हात होता ? हे बघणे रंजक असणार आहे ... दुसरीकडे अजिंक्यला देखील एक चांगली बातमी घरच्यांना द्यायची आहे. ही चांगली बातमी काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी ही मालिका नक्की पहा.


Web Title: Lakshmi will return to Arvitai, complete the 300-odd section of 'Lakshmi Sadhan Manangalam'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.