ठळक मुद्देलागीरं झालं जी या मालिकेत ही जयडी आपल्याला नेहमीच भारतीय पेहरावात दिसून येते. पण खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील आवडतात. तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर तर आपल्याला तिचे स्टायलिश अंदाजातील अनेक फोटो पाहायला मिळतात.

छोट्या पड्यावरील 'लागीरं झालं जी' मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक बनत चालली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल ही जोडी रसिकांना चांगलीच भावते आहे. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तिरेखेचं विशेष महत्त्व आहे. यात अजिंक्यचा मित्र राहुल्या, विक्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी रसिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. सध्या जयडी साकारणारी पूर्वा शिंदे ही चाहत्यांमध्ये चांगलीच फेव्हरेट ठरत आहे. 

लागीरं झालं जी या मालिकेत ही जयडी आपल्याला नेहमीच भारतीय पेहरावात दिसून येते. पण खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील आवडतात. तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर तर आपल्याला तिचे स्टायलिश अंदाजातील अनेक फोटो पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो.

 

सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे विविध अदा असलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळतात. मालिकेत बहुतांशी साडीमध्ये आणि पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी जयडी ही प्रत्यक्षात रिअल लाइफमध्येही स्टायलिश असल्याचं या फोटोवरून पाहायला मिळत आहे. पूर्वा शिंदे पुण्यात राहत असून तिने हॉस्टेल गर्ल या सिनेमांत देखील काम केलं होते.

प्रियाला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतात. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोजमधून तिला वेस्टर्न लूकची आवड असल्याचे दिसते. पूर्वा शिंदे जयडी भूमिकेमुळे रसिकांना भावली आहे. त्यातच तिचा हा रिअल लाइफ स्टायलिश अंदाज पाहून तिच्या चाहत्यांच्या संख्यतेही वाढ होत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 53 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मालिकेत जयडी ही भूमिका पूर्वाच्या आधी अभिनेत्री किरण ढाणे हिने साकारली होती. मात्र मानधन वाढवून न दिल्याने तिने ही मालिका सोडली होती. लागीरं झालं जी मालिकेनंतर किरण आता डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत झळकत आहे. 'एक होती राजकन्या' मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली असून तिची ही भूमिका प्रेक्षकांना भावत आहे. 

Web Title: Lagira Jhala Ji fame Poorva Shinde real life picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.