'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत लगीनघाई!, सरु आणि सुर्याचा पुन्हा एकदा पार पडणार विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 03:01 PM2021-06-17T15:01:00+5:302021-06-17T15:01:33+5:30

लग्नाच्या निमित्ताने मोरे कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. अंजी पश्या आणि अवनी वैभवचा खास डान्स परफॉर्न्सही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Laginghai in 'Sahakutumb Sahaparivar' series! | 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत लगीनघाई!, सरु आणि सुर्याचा पुन्हा एकदा पार पडणार विवाहसोहळा

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत लगीनघाई!, सरु आणि सुर्याचा पुन्हा एकदा पार पडणार विवाहसोहळा

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत सध्या उत्सुकता आहे ती सरु आणि सुर्याच्या लग्नाची. या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण कुटुंबाने त्यांचं लग्न पुन्हा एकदा धुमधडाक्यात करण्याचं ठरवलं आहे. मालिकेच्या नावाप्रमाणेच सहकुटुंब सहपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पुढाकार घेत लग्नाची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे मालिकेत पुन्हा एकदा सरु आणि सुर्याचा विवाहसोहळा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

लग्नाच्या निमित्ताने मोरे कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. अंजी पश्या आणि अवनी वैभवचा खास डान्स परफॉर्न्सही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकीकडे आनंदाचं जरी वातावरण असलं तरी अवनी आणि वैभवच्या नात्यातला तणाव मात्र कायम आहे.

अवनी आई होणार आहे. मात्र आत्याने दिलेली जॉबची ऑफर वैभवने स्वीकारली तरच ती या मुलाला जन्म देईल अशी अट अवनीने घातली आहे. त्यामुळे वैभव नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे ‘सहकटुंब सहपरिवार’ मालिकेचे यापुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत. त्यासाठी पाहायला विसरु नका सहकुटुंब सहपरिवार सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 काही दिवसांपूर्वी ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने ३०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्त ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या सेटवर सेलिब्रेशन पार पडले होते. संपूर्ण टीमने केक कट करत धमाल मस्ती केली आहे. कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला होता.
 

Web Title: Laginghai in 'Sahakutumb Sahaparivar' series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.