Kishori shahane and Nishigandha Wad in chala hava yeu dya | चला हवा येऊ द्या मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील या मैत्रिणी सांगणार आपल्या मैत्रीविषयी
चला हवा येऊ द्या मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील या मैत्रिणी सांगणार आपल्या मैत्रीविषयी

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षं झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड आवडत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला नुकताच गाठला. आतापर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्याचे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या - होउ दे व्हायरल' च्या मंचावर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका बाजीचे कलाकार अभिजित श्वेतचंद्र, प्रखरसिंग आणि नुपूर दैठणकर हजेरी लावणार आहेत. तसेच बेस्ट फ्रेंड्स असलेल्या अभिनेत्रींची जोडी देखील या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामध्ये अभिनेत्री किशोरी शहाणे-निशिगंधा वाड आणि ऋजुता देशमुख-मधुरा वेलणकर या अभिनेत्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. स्पर्धकांच्या धमाल परफॉर्मन्ससोबतच चला हवा येऊ द्याच्या विनोदवीरांनी शहंशाह या सुप्रसिद्ध चित्रपटाचे स्पूफ सादर केले. भाऊ कदम शहंशाह तर सागर कारंडे इन्स्पेक्टर विजय यांच्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पडणार आहेत. त्याचसोबत बाजी मालिकेतील अभिनेत्री नुपूर दैठणकर शास्त्रीय नृत्य सादर करणार आहे. 

प्रेक्षकांना ही धमाल मस्ती चला हवा येऊ द्या, होउ दे व्हायरल या कार्यक्रमात १० आणि ११ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० ला झी मराठी वर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा हा भाग देखील प्रेक्षकांना तितकाच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. 
 


Web Title: Kishori shahane and Nishigandha Wad in chala hava yeu dya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.