Khatron Ke Khiladi 10: सेटवर या स्पर्धकाच्या कानात घुसला कॉक्रोच, अशी झाली होती तिची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 12:29 PM2020-02-27T12:29:12+5:302020-02-27T12:29:51+5:30

खतरों के खिलाडीच्या सेटवर पहिल्याच स्टंटमध्ये अदाची अवस्था अगदी त्रासदायक ठरली हाच किस्ता तिने तिच्या एका मुलाखतीत सांगितला.

Khatron Ke Khiladi 10: Adaa Khan slept with a cockroach in her ears; shares the horrifying incidence-SRJ | Khatron Ke Khiladi 10: सेटवर या स्पर्धकाच्या कानात घुसला कॉक्रोच, अशी झाली होती तिची अवस्था

Khatron Ke Khiladi 10: सेटवर या स्पर्धकाच्या कानात घुसला कॉक्रोच, अशी झाली होती तिची अवस्था

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी हा रिअॅलिटी शो आता सुरू झाला आहे. एकसे बढकर एक  सेलिब्रेटी  स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. अनेक खतरनाक स्टंट करत येणा-या आव्हांनाना हे स्पर्धक कसे सामोरे जाणार हे पाहणे दिवसेंदिवस अधिक रंजक होणार आहे. अदा खान खतरों के खिलाडी १० मध्ये सहभागी झाली होती. काही दिवसांनंतरच या शोमधून अदा खान एलिमिनेटही झाली आहे. एलिमिनेशन राऊंडमध्ये अदाने स्टंट 100 टक्के देऊन केला मात्र तरीही स्वत:ला एलिमिनेट होण्यापासून वाचवू शकली नाही. 


अदाला तिच्या 'नागिन' या मालिकेनंतर जास्त लोकप्रियता मिळाली. 'सितारा : विष या अमृत' या मालिकेतही तिने काम केले आहे. या शोमध्ये एक से बढकर एक स्टंट करताना अदाला रसिकांनी पहिल्यांदाच पाहिले.  खतरों के खिलाडीच्या सेटवर पहिल्याच स्टंटमध्ये अदाची अवस्था अगदी त्रासदायक ठरली हाच किस्ता तिने तिच्या एका मुलाखतीत सांगितला. 

पहिलाच टास्क किडे आणि कॉक्रोचने भरलेला होता. हा टास्क तिने पूर्णही केला. पण टास्कदरम्यान तिच्या कानात कॉक्रोच घुसल्यामुळे ती पूर्ण रात्र झोपु शकली नाही. दुस-या दिवशी सकाळीच शोच्या टीमने तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या कानातून कॉक्रोच काढला. कानात कॉक्रोच गेला हे कळताच अदाचा थरकाप उडाला होता. मात्र स्वतःला धीर देत त्यावरच न थांबता आणि त्या गोष्टीचा बावू न करता आगामी आव्हांनावर मात करण्याचे बळ तिला यामुळे मिळाले असल्याते तिने सांगितले.

Web Title: Khatron Ke Khiladi 10: Adaa Khan slept with a cockroach in her ears; shares the horrifying incidence-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.