दुस-यांदा आई बनणार चाहत खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 06:42 AM2017-07-24T06:42:38+5:302017-07-24T12:12:38+5:30

'बडे अच्छे लगते है' या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री  चाहत खन्ना दुसऱ्यांदा आई बनणार आहे.चाहतने सोशल मीडियावर काही ...

Khanna wants to be a mother for the second time | दुस-यांदा आई बनणार चाहत खन्ना

दुस-यांदा आई बनणार चाहत खन्ना

googlenewsNext
'
;बडे अच्छे लगते है' या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री  चाहत खन्ना दुसऱ्यांदा आई बनणार आहे.चाहतने सोशल मीडियावर काही फोटोज् शेअर केले आहेत ज्यात ती तिचे बेबी बम्प दाखवत आहे.चाहत खन्नाने गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. आता तिचे हे पहिले बाळ 10 महिन्याचे झाले आहे.आता चाहत दुस-यांदा आई होणार असल्याचे तिने ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.चाहतने तिच्या मुलीचे नाव जोहर असे ठेवले आहे. चाहत गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. 'कबूल है' या मालिकेनंतर ती छोट्या पडद्यावर झळकलीच नाही. 2013ला चाहत खन्नाने फरहान मिर्झासोबत लग्न केले. फरहान हा प्रसिद्ध लेखक शाहरुख मिर्झा यांचा मुलगा आहे.चाहतने वयाच्या केवळ 16 व्या वर्षी भरत नरसिंघानी या बिझनेसमनसोबत प्रेमविवाह केला होता.डिसेंबर 2016 मध्ये चाहतने लग्न केले होते. लग्नासाठी चाहतने लोकप्रिय मालिका 'बडे अच्छे लगते है' सोडली होती. केवळ 7 महिन्यातच हे नाते संपुष्टात आले.चाहतने आतापर्यंत 'बडे अच्छे लगते है', कबूल है 'कुमकुम: प्यारा सा बंधन', 'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'हीरो भक्ति की शक्ति है' यांसारख्या मालिकेत झळकली होती.





मुलगी जोहरला वेळ देता यावा म्हणून चाहत मालिकांमध्ये काम करण्यास नकार देत होती. आता दुस-या बाळ येणार असल्यामुळे चाहत आणखी बिझी होणार आहे.चाहत सध्या मालिकांपासून दूर असली तरी मदरहुड इन्जॉय करत आहे.चाहत नेहमीच तिच्या मुलीसोबत इन्सटाग्रामवर फोटो टाकत असते.आईचा जॉब हा फुल टाईम जॉब असल्यामुळे मला अधिक लक्ष मुलांकडे द्यायचे आहे.त्यामुळे मालिकांमध्ये काम करणार की नाही याविषयी मी काही प्लॅनिंग केले नसल्याचे तिने एका मुलाखती म्हटले होते.

Web Title: Khanna wants to be a mother for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.