ठळक मुद्देरसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री कविता कौशिकने एफआयआर या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले.

टीव्ही शो ‘एफआयआर’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कविता कौशिक हिने दोन वर्षांपूर्वी बॉयफ्रेन्ड रोनित बिस्वाससोबत लग्नगाठ बांधली होती. कविता आणि रोनित एकमेकांमध्ये आकंठ बुडाले आणि अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजही कविता आणि रोनित यांचे प्रेम तितकेच टवटवीत आहे. सोशल मीडियावरचे त्यांचे फोटो बरेच काही सांगणारे आहेत. साहजिकच, कविता व रोनितच्या संसारवेलीवर फुल कधी फुलणार, याची अनेकांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे आई होण्याबद्दल कविताला अनेकदा विचारण्यात आले. पण आता कविताने याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. होय, कधीही आई न होण्याचा निर्णय कविताने घेतला आहे.


ताज्या मुलाखतीत कविताने आपल्या या निर्णयाबद्दल सांगितले.  कधीही आई न होण्याचा निर्णय मी घेतला आहे. रोनितही माझ्या या निर्णयात सामील आहे. याचे कारण म्हणजे, मी माझ्या मुलावर कुठलाही अन्याय करू इच्छित नाही. ४० व्या वर्षी मी आई होणार असेल तर माझा मुलगा २० वर्षांचा होईपर्यंत मी वृद्धापकाळाच्याउंबरठ्यावर असेल. केवळ २० व्या वर्षी माझ्या मुलावर त्याच्या म्हाताºया आई-वडिलांची जबाबदारी यावी, हे मला नको आहे. आम्हाला हे जग शांत, सुंदर हवे आहे. गर्दीने बजवलेल्या या जगाला आणखी मोठे करण्याचा आमचा कुठलाही विचार नाही. या गर्दीत आणखी भर घालून मुलाला मुंबईत धक्के खाण्यासाठी सोडून द्यावे, असे मला मुळीच वाटत नाही, असे कविताने सांगितले.


माझा पती रोनित खूप लहान असताना त्याचे आई-वडिल गेलेत. माझ्यासोबतही असेच घडले. घरातली मोठी या नात्याने मला प्रचंड मेहनत करावी लागली. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागलेत. सध्या मी व रोनित अगदी लहान मुलांसारखे आयुष्य एन्जॉय करतोय. आमचे बालपण कोमेजले. आताश: आम्ही ही खाली जागा भरण्याचा प्रयत्न करतो. मी अजूनही माझ्या पित्याने वाढवलेल्या कुटुंबाच्या जबाबदाºया उचलते आहे. अजूनही मी त्यांची मदत करते, असेही तिने सांगितले.

Web Title: kavita kaushik decides not to get pregnant ever here is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.