OMG! घागरा न घालताच सेटवर पोहोचली ही अभिनेत्री, अशी झाली फजिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:44 PM2019-11-27T14:44:53+5:302019-11-27T14:45:01+5:30

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

kasautii zindagii kay 2 actress erica fernandes forgets to wear ghagra | OMG! घागरा न घालताच सेटवर पोहोचली ही अभिनेत्री, अशी झाली फजिती

OMG! घागरा न घालताच सेटवर पोहोचली ही अभिनेत्री, अशी झाली फजिती

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये एरिका प्रेरणाची भूमिका साकारते आहे.

एकता कपूरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘कसौटी जिंदगी की 2’ची लीड अ‍ॅक्ट्रेस एरिका फर्नांडिस टीव्हीची सर्वाधिक कूल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चाहत्यांसाठी सेटवरचे रोज नवे व्हिडिओ ती शेअर करत असते. आता एरिकाने एक ‘बिहाईन्ड द सीन’ व्हिडीओ शेअर केला आहे. तो सुद्धा स्वत:ची फजिती दाखवणारा.
होय, सध्या एरिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यात एरिका पूर्णपणे ट्रॅडिशनल लूकमध्ये आहे. सेटवर शोची टीम काहीतरी चर्चा करताना दिसते. याचदरम्यान शूटींगसाठी एरिका  सेटवर येते. पण हे काय, ती घागरा घालायलाच ती विसरते.

 जीन्स, त्यावर टॉप आणि डोक्यावर ओढणी घातलेल्या एरिकाला पाहून सगळेच थक्क होतात. यह क्या है, घागरा तो पहन लो, असे दिग्दर्शक तिला आठवण करून देतो. यानंतर आपण घागरा न घालताच सेटवर आल्याचे एरिकाला कळते आणि ती लाजते. अर्थातच सेटवर सगळे तिची फजिती झालेले पाहून हसायला लागतात. यानंतर कुठे स्पॉटबॉय तिचा घागरा घेऊन येतो.


  एरिकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. काहींनी एरिका खूपच विनोदी असल्याचे म्हटलं आहे. तर काहीनी लिहिलं, मी हसून हसून मरेन. याशिवाय एरिकाच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांच्याही कमेंट पाहायला मिळत आहेत. ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये एरिका प्रेरणाची भूमिका साकारते आहे.

Web Title: kasautii zindagii kay 2 actress erica fernandes forgets to wear ghagra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.