‘कयामत की रात’मध्ये करिश्मा तन्ना दिसणार या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 02:04 PM2018-07-30T14:04:09+5:302018-07-30T18:07:42+5:30

कयामत की रात या मालिकेतील करिश्माचा लूकदेखील आता खूपच वेगळा असणार आहे. तिच्या या लूकवर मालिकेच्या टीमने चांगलीच मेहनत घेतली आहे.

Karishma tanna will play quuen's role in Qayamat Ki Raat | ‘कयामत की रात’मध्ये करिश्मा तन्ना दिसणार या भूमिकेत

‘कयामत की रात’मध्ये करिश्मा तन्ना दिसणार या भूमिकेत

googlenewsNext

‘नागीन’ आणि ‘कयामत की रात’ या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना सध्या चर्चेत आहे. सगळीकडे तिचीच चर्चा आहे. अगदी अलीकडे रणबीर कपूर स्टारर ‘संजू’ या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात करिश्माची भूमिका अगदीच छोटी होती. पण त्यातही तिने आपली छाप सोडली होती. सध्या ती कयामत की रात या मालिकेत झळकत आहे.

वैशिष्ट्यपूर्ण कथानक आणि दिग्गज कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘कयामत की रात’ या मालिकेने प्रेक्षकांमधील उत्कंठा कायम ठेवली आहे. ही मालिका नुकतीच सुरू झाली असली तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका यशस्वी करण्यासाठी निर्मात्यांनीही चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न केले असून आता या मालिकेत एक नवा गौप्यस्फोट होणार असून त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे.

मालिकेच्या कथानकाला मिळालेल्या या कलाटणीमुळे सारे चित्रच पालटून जाणार आहे. या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना आता राणी असल्याचे दाखविले जाणार आहे. ती एका शाही घराण्याची वारस असून तांत्रिक कालासुर आयुष्यभर तिचाच शोध घेत होता असे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

कयामत की रात या मालिकेतील करिश्माचा लूकदेखील आता खूपच वेगळा असणार आहे. तिच्या या लूकवर मालिकेच्या टीमने चांगलीच मेहनत घेतली आहे. आता राणी बनल्यामुळे करिश्माच्या अंगावर प्रेक्षकांना अनेक दागदागिने आणि भरजरी साड्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ती खरोखरच एखाद्या राजघराण्यातील स्त्री प्रमाणेच दिसणार आहे.

करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. आता ‘कयामत की रात’मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडेल अशी कयामत की रात या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: Karishma tanna will play quuen's role in Qayamat Ki Raat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.