सिनेमा असो वा मालिका माझ्यासाठी 'हीच' गोष्ट महत्त्वाची, सांगतेय ही अभिनेत्री

By गीतांजली | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:00+5:30

करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

karishma tanna saying content is more important for me in serial | सिनेमा असो वा मालिका माझ्यासाठी 'हीच' गोष्ट महत्त्वाची, सांगतेय ही अभिनेत्री

सिनेमा असो वा मालिका माझ्यासाठी 'हीच' गोष्ट महत्त्वाची, सांगतेय ही अभिनेत्री

googlenewsNext

करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम, 'जोर का झटका', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल', 'बिग बॉस 8', यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच ती 'खतरों के खिलाडी 10'मध्ये दिसणार आहे. तिच्या या थ्रीलिंग अनुभवाविषयी साधलेला हा खास संवाद.


अनेक वेळा तू या शोची ऑफर नाकारली होतीस, आता कोणती तयारी करुन तू या शोमध्ये सहभागी झालीस?  
माझा स्वभाव शीघ्रकोपी आहे. शीघ्रकोपी स्वभावाच्या लोकांना या शोमध्ये एखादा सोपा स्टंटसुद्धा घाबरुन पूर्ण नाही करु शकत. त्यामुळे या शोमध्ये तुम्ही शांत, स्थैर्य आणि संयमी असणं फार गरजेचे आहे. तेच आणलं मी, यासाठी मी योगा केला, माझी शारिरीक क्षमता वाढवली अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींवर मी काम केले . 

 

हार के बाद जीत है, याचा प्रत्यय तुला कोणत्या टास्कमधून आला ?
मला कोणत्या एका गोष्टीची अशी भीती वाटत नाही जे मी सांगू शकते. मला मुळात हे माहितीच नाहीय की मला कोणत्या गोष्टीचा फोबिया आहे. जसे जसे मी स्टंट करत होते तसे प्रत्येक स्टंटमध्ये भीती वाटत होती आणि प्रत्येक स्टंट केल्यानंतर एक भारीवाले फिलिंग यायचे. फक्त मला एक भीती होती की पाण्याच्या खाली मी जास्त वेळ श्वास धरु शकले नाही तर, नाका तोंडात पाणी गेले तर असे विचार माझ्या मनात नक्कीच यायचे. त्यामुळे मी असे म्हणू शकते जे पाण्याखालचे स्टंट होते त्यावर मी मात केली.

रोहित शेट्टी तुम्हाला कसे प्रोत्साहन द्यायचा प्रत्येक स्टंटसाठी ?
रोहित शेट्टी सर खूप जास्त प्रोत्साहन द्यायचा. ते जेव्हा आजूबाजूला असायचे तेव्हा वाटायचं हा स्टंट होऊन जाईल. ते एक असे व्यक्ती आहे ज्यांच्याकडून मानसिक आधार खूप मिळतो. स्टंट करताना जी मानसिक स्थिरता आणि शांतता हवी असते ती सर देतात. 

 

सोशल मीडियावर तू खूप अॅक्टिव्ह असतेस, अनेक वेळा सेलिब्रेटींना ट्रोल केले जाते, याकडे तू कशी बघतेस?
तुम्हाला वाटते का माझ्या तेवढा वेळा आहे की मी ट्रोल्सकडे लक्ष देईन. जेव्हा तुम्ही प्रसिद्ध असता, कलाकार असता त्यावेळी ट्रोलिंग तर होणारच. दीपिका पादुकोण, जॅकलिन, वरुण धवन यांनादेखील ट्रोल केले जाते तर मी सुद्धा या इंडस्ट्रीचा एका भाग आहे. त्यामुळे हे ट्रोलिंग असेच चालत राहणार. 

 

टीव्ही आणि वेबसिरीज या दोन्ही माध्यांमध्ये काम करताना तुला काय फरक जाणवला ?
टीव्हीमध्ये काम करताना 12 तास तुम्ही एकच भूमिका करता. वेबसिरीज करताना तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात. एक वेबसिरीज संपली की तुम्हाला दुसरी करण्याची संधी मिळते. मी कोणत्याही माध्यमांत काम करताना मी आशय बघते. माझ्या भूमिकेला यात कितपत वाव आहे. या गोष्टींना मी प्राधान्य देते. लवकरच मी वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.      
   

Web Title: karishma tanna saying content is more important for me in serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.