​करण वाहीने हेट स्टोरीचे चित्रीकरण या कारणामुळे ढकलले पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 08:00 AM2017-12-20T08:00:55+5:302017-12-20T13:30:55+5:30

करण वाहीने रिमिक्स या मालिकेद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेत त्याने साकारलेली रणवीरची भूमिका चांगलीच गाजली होती. या ...

Karan Vahee's posting of Hate Story pushed for further reason | ​करण वाहीने हेट स्टोरीचे चित्रीकरण या कारणामुळे ढकलले पुढे

​करण वाहीने हेट स्टोरीचे चित्रीकरण या कारणामुळे ढकलले पुढे

googlenewsNext
ण वाहीने रिमिक्स या मालिकेद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेत त्याने साकारलेली रणवीरची भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर मेरे घर आई एक नन्ही परी, दिल मिल गये यांसारख्या मालिकांमध्ये करणने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. याप्रमाणेच कुछ तो लोग कहेंगे, दिल दोस्ती दिवानेपन की यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला. करणने आजवर छोट्या पडद्यावर खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता करण वाही इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. हा एक टायलेंट हंट शो असून या कार्यक्रमात करण रित्विक धनजानीसोबत सूत्रसंचालन करताना आपल्याला दिसणार आहे.
करणने मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर २०१४ मध्ये तो मोठ्या पडद्याकडे वळला. त्याने दावत ए इश्क या चित्रपटात काम केले होते. आता तो हेट स्टोरी ४ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हे लंडनमध्ये होणार आहे. पण त्याच्या चित्रपटाच्या तारखा आणि कार्यक्रमाच्या तारखा यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने त्याने आपल्या या चित्रपटाचे चित्रीकरण इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमासाठी पुढे ढकलले आहे. याविषयी तो सांगतो, मी इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स हा कार्यक्रम खूप आधी स्वीकारला होता. त्यामुळे या कार्यक्रमाला प्राधान्य देण्याचे मी ठरवले. त्याशिवाय मला खरी प्रसिद्धी ही छोट्या पडद्यामुळे मिळाली आहे. त्यामुळे छोटा पडदा हे माझे पहिले प्रेम आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याबद्दल करण सांगतो, “रित्विकसोबत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. आम्हाला पुन्हा एकदा एकत्र शो करता येत आहे याचा मला खूप आनंद होत आहे.”
आजच्या घडीतील बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शक करण जोहर आणि रोहित शेट्टी इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत. 

Web Title: Karan Vahee's posting of Hate Story pushed for further reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.