ठळक मुद्देबरखा आणि करण सिंग ग्रोव्हरने २००४ मध्ये कितनी मस्त है जिंदगी या मालिकेत काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्यांचे सूत जमले. त्या काळात अनेक कार्यक्रमात, पार्टींमध्ये ते एकत्र दिसत. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी साखरपुडा देखील केला होता. पण २००६ मध्य

करण सिंग ग्रोव्हर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. करण आता त्याच्या वैयक्तिक नव्हे तर व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. करण कसौटी जिंदगी की २ या मालिकेत मि. बजाज या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे करणने कसौटी जिंदगी की या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये प्रेरणाच्या जावयाची भूमिका साकारली होती. करण मि. बजाज या भूमिकेला योग्य न्याय देईल अशी त्याच्या चाहत्यांना खात्री आहे.

करणचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे. कारण त्याने आतापर्यंत तीन लग्नं केली असून त्याच्या तिन्ही पत्नी या अभिनेत्री आहेत. त्याचे पहिले लग्न श्रद्धा निगमसोबत दुसरे जेनिफर विंगेट आणि तिसरे लग्न बिपाशा बासूसोबत झाले आहे. करणचे या तीन अभिनेत्रींसोबतच निकोल अल्वरस या कोरिओग्राफरसोबत देखील नाव जोडण्यात आले होते. झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या वेळी त्या दोघांच्या नात्याची चांगलीच चर्चा झाली होती. 

तुम्हाला माहीत आहे का, करणने तीन लग्न करण्यासोबतच एका अभिनेत्रीसोबत साखरपुडा देखील केला होता. या अभिनेत्रीसोबत त्याने लग्न करण्याचे ठरवले होते. पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. ही अभिनेत्री बरखा बिष्ट असून तिने प्यार के दोन नाम एक राधा एक श्याम, कसौटी जिंदगी की, क्या ये प्यार है, नामकरण, श्रीमान श्रीमती फिर से, काल भैरव रहस्य यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 

बरखा आणि करण सिंग ग्रोव्हरने २००४ मध्ये कितनी मस्त है जिंदगी या मालिकेत काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्यांचे सूत जमले. त्या काळात अनेक कार्यक्रमात, पार्टींमध्ये ते एकत्र दिसत. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी साखरपुडा देखील केला होता. पण २००६ मध्ये त्यांनी ब्रेकअप केले.

बरखाचे अभिनेता इंद्रनेल सेनगुप्तासोबत लग्न झाले असून त्या दोघांनी प्यार के दो नाम एक राधा एक श्याम या मालिकेत एकत्र काम केले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. 


Web Title: Karan Singh Grover-Barkha Bisht were engaged
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.