Kapil Sharma's first response to the shutdown of the Kapil Sharma show | ​कपिल शर्माने द कपिल शर्मा शो बंद होण्याबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया
​कपिल शर्माने द कपिल शर्मा शो बंद होण्याबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया
द कपिल शर्मा शो हा सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम होता. पण सुनील ग्रोव्हर, अली असगर यांनी हा कार्यक्रम सोडल्यानंतर या कार्यक्रमाचा टिआरपी दिवसेंदिवस कमी होत गेला आणि आता तर गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा आजारी असल्याने या कार्यक्रमाचे चित्रीकरण रद्द करावे लागत आहे. कपिल आजारी असल्याने चित्रीकरण करणे त्याला शक्य नसल्याने हा कार्यक्रम आता काही दिवसांचा ब्रेक घेणार असल्याची घोषणा नुकतीच सोनी वाहिनीने केली आहे.
कपिलचा कार्यक्रम बंद होणार हे ऐकून द कपिल शर्मा शो च्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. कपिलने त्याचा कार्यक्रम बंद होणार यावर नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे. तो सांगतो, माझी तब्येत चांगली नसल्याने मी काही दिवस तरी आराम करणार आहे. पण मी लवकरच नवीन जोशात, उत्साहात परत येणार आहे. लोकांना द कपिल शर्मा शो पुन्हा एकदा पाहायला नक्कीच मिळणार आहे. माझा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्यामुळे पुढील काळात तर मला जास्तीत जास्त वेळ चित्रपटाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे सध्या मला नितांत आरामाची गरज आहे. सोनी वाहिनीने माझ्या तब्येतीचा विचार करून माझ्या कार्यक्रमाला काही दिवसांचा ब्रेक दिला आहे यासाठी मी त्यांचा आभारी आहे.
कपिलला काही दिवसांपासून रक्तदाबाचा त्रास होत आहे. कामाच्या तणावामुळे त्याची तब्येत ढासळली असल्याने काही दिवस तरी त्याने कामापासून दूर राहाण्याचे ठरवले आहे. यावरून सुनील ग्रोव्हरसोबत विमानात झालेल्या भांडणानंतर कपिलचे वाईट दिवसच सुरू आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. 

Also Read : वारंवार का आजारी पडतोयं कपिल शर्मा? हे तर नाही खरे कारण??
Web Title: Kapil Sharma's first response to the shutdown of the Kapil Sharma show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.