‘बच्चा यादव’ अडचणीत, किकू शारदाविरोधात एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 01:30 PM2019-08-06T13:30:17+5:302019-08-06T13:31:11+5:30

‘द कपिल शर्मा शो’मध्ये  बच्चा यादवचे पात्र साकारणारा किकू शारदा सध्या एका वादात अडकला आहे.

the kapil sharma show comedian kiku sharda and five others accused of money fraud |  ‘बच्चा यादव’ अडचणीत, किकू शारदाविरोधात एफआयआर

 ‘बच्चा यादव’ अडचणीत, किकू शारदाविरोधात एफआयआर

googlenewsNext
ठळक मुद्देकिकू शारदा याआधीही वादात सापडला आहे.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये  बच्चा यादवचे पात्र साकारणारा किकू शारदा सध्या एका वादात अडकला आहे. होय, किकू शारदासह सहा लोकांवर फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आर्ट डायरेक्टर नितीन कुलकर्णी यांनी अंबोली पोलिस ठाण्यात सहा लोकांविरोधात एफआयआर दाखल केला. हे लोक मुंबई फेस्ट नामक एका चॅरिटेबल ट्रस्टशी संबधित आहेत. या सर्वांनी 50.70 लाख रूपयांनी फसवणुक केल्याचा नितीन कुलकर्णी यांचा आरोप आहे. नितीन कुलकर्णी यांना गतवर्षी तीन दिवसांच्या एका इव्हेंटसाठी स्टेज डिझाईन करण्याचे काम सोपवण्यात आले होते. या कामाच्या मोबदल्यात त्यांना चेक दिला गेला. पण हा चेक बाऊन्स झाला. दरम्यान किकू शारदाने स्वत:वरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.


गतवर्षी जानेवारीत वांद्रयातील कुर्ला कॉम्प्लेक्सच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर तीन दिवसांचा इव्हेंट झाला होता. या इव्हेंटसाठी कुलकर्णी यांनी स्टेज डिझाईन केले होते. पण या कामाचे पैसे मिळाले नसल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला आहे. किकू शारदाचे वडील अमरनाथ शारदा ट्रस्टचे सचिव आहेत.

माझे देणेघेणे नाही
संबंधित चॅरिटेबल ट्रस्टशी माझा काहीही संबंध नाही. अन्य सेलिब्रिटींप्रमाणे मी या इव्हेंटला हजर होतो. मुंबई फेस्टचा मी सदस्यही नाही.गतवर्षी इव्हेंट आयोजित केला गेला होता. यात माझे वडील ट्रस्टी म्हणून सामिल झाला होता. या ट्रस्टचे एकूण 5 ट्रस्टी आहेत. माझा याच्याशी दुरान्वयाने संबंध नाही. मी केवळ एका ट्रस्टीचा मुलगा आहे. माझे वडिल माझ्या नावाचा वापर करून हा इव्हेंट यशस्वी करू इच्छित होते. माझ्या वडिलांनी मला सांगितल्यानुसार, संबंधित व्यक्तिने दिलेल्या शब्दानुसार काम केले नाही. याऊपर तो अतिरिक्त पैशांची मागणी करत होता. त्यामुळे त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला, असे किकू शारदाने सांगितले.


किकू शारदा याआधीही वादात सापडला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने डेरा सच्चा सौदाच्या गुरमीत राम रहिम सिंहची आपल्या कॉमेडी शोमध्ये मिमिक्री केली होती. यावरून त्याला अटक करण्यात आली होती. अर्थात नंतर किकूने गुरमीत राम रहिम सिंहच्या समर्थकांची माफी मागितली होती आणि हे प्रकरण निवळले होते.

Web Title: the kapil sharma show comedian kiku sharda and five others accused of money fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.