पब्लिक की पुरजोर माँग पर...! कपिल शर्माने पहिल्यांदा शेअर केला मुलगा त्रिशानचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:16 AM2021-06-21T10:16:16+5:302021-06-21T10:22:42+5:30

कपिलने मुलगी अनायराचे अनेक फोटो शेअर केले होते. पण मुलाचा चेहरा लोकांपासून लपवून ठेवला होता. पहिल्यांदा त्याने त्रिशानचा फोटो शेअर केला आहे.

kapil sharma shared first photo of trishaan with anaira on public demand | पब्लिक की पुरजोर माँग पर...! कपिल शर्माने पहिल्यांदा शेअर केला मुलगा त्रिशानचा फोटो

पब्लिक की पुरजोर माँग पर...! कपिल शर्माने पहिल्यांदा शेअर केला मुलगा त्रिशानचा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देरसिकांना खळखळून हसवण्याचे आणि त्यांचे तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल आपल्या शोच्या माध्यमातून करतो.

कॉमेडियन कपिल शर्माला  (Kapil Sharma ) ‘द कपिल शर्मा शो’ने पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळून दिली.  सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कपिल त्याच्या मेहनतीने आज सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटींच्या यादीत सामिल झाला आहे. तूर्तास कपिल शर्माची एक पोस्ट जाम चर्चेत आहे. होय, कपिलने त्याच्या दोन्ही मुलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 
कपिलने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यात अनायरा आणि चिमुकला त्रिशान त्याच्या मांडीवर बसलेली आहेत. पब्लिकच्या मागणीनंतर अनायरा व त्रिशान पहिल्यांदा एकत्र..., असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे. (Kapil Sharma shared first photo of Trishaan )

त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही तासांत 13 लाखांवर लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.
कपिलने मुलगी अनायराचे अनेक फोटो शेअर केले होते. पण मुलाचा चेहरा लोकांपासून लपवून ठेवला होता. पहिल्यांदा त्याने त्रिशानचा फोटो शेअर केला आहे. कपिल शर्मा व गिन्नी चतरथ यांनी डिसेंबर 2018 साली लग्न केले होते. डिसेंबर 2019 रोजी गिन्नीने पहिल्या मुलीला जन्म दिला होता. यानंतर  1 फेबु्रवारीला गिन्नी दुस-यांदा आई झाली होती. मुलगा झाल्याची गोड बातमी कपिलने सोशल मीडियावर शेअर केली होती.

रसिकांना खळखळून हसवण्याचे आणि त्यांचे तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल आपल्या शोच्या माध्यमातून करतो. अख्या जगाला हसवणारा कपिलला इथपर्यंत पोहचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. अत्यंत हलाखीचे आयुष्य कपिलच्या वाट्याला आले .कमी वयात त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली.त्यामुळं दुपट्टा विकण्याचेही काम कपिलने केले आहे. तर चार वर्ष त्याने फोन आॅपरेटर म्हणूनही नोकरी केली.

Web Title: kapil sharma shared first photo of trishaan with anaira on public demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.