जय भानुशालीने दिले नेहा कक्कर आणि बादशाहला आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 04:13 AM2017-12-29T04:13:30+5:302017-12-29T09:43:30+5:30

'द व्हॉईस इंडिया किड्स'चा होस्ट जय भानुशाली प्रतिभेचा पॉवर हाऊस आहे. अभियन, नृत्य, होस्टिंगच्या माध्यमातून जय अद्वितीय विलक्षणता आणि ...

Jay Bhanushali gave Neha Kakkar and challenge to the King! | जय भानुशालीने दिले नेहा कक्कर आणि बादशाहला आव्हान!

जय भानुशालीने दिले नेहा कक्कर आणि बादशाहला आव्हान!

googlenewsNext
'
;द व्हॉईस इंडिया किड्स'चा होस्ट जय भानुशाली प्रतिभेचा पॉवर हाऊस आहे. अभियन, नृत्य, होस्टिंगच्या माध्यमातून जय अद्वितीय विलक्षणता आणि मुलांप्रती असलेल्या त्याच्या प्रेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. 'व्हॉईस ऑफ किड्स'च्या सर्वच भागांमध्ये तो त्याच्या विलक्षण विनोदबुद्धीच्या जोरावर मजा वाढवताना दिसतो. नववर्षानिमित्ताच्या आगामी विशेष भागात तो खास पाहुणे नेहा कक्कर आणि बादशाह यांना विचित्र आव्हान देताना दिसणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, नेहा कक्कर आणि बादशाहला जय आव्हानात्मक परिस्थितींमध्ये गायनाचे आव्हान देणार आहे. नेहाला फुग्यांचा पोषाख घालण्यास सांगून ६० सेकंदांपर्यंत एक गाणं गायला सांगणार आहे. त्यादरम्यान दोन मुले ते फुगे पिनच्या साह्याने फोडून नेहाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे, बर्फाच्या तुकड्यावर अनवाणी उभे राहून ६० सेकंदांपर्यंत गाणं गाण्यास सांगण्यास आहे. बादशाहसुद्धा हे आव्हान स्वीकारणार आहे. पण, तो हे आव्हान पेलण्यात यशस्वी होईल? त्याचा हा परफॉर्मन्स पाहून नेहा आणि शानही त्याच्या जोडीला हा प्रकार करण्याचा प्रयत्न करतील. या दरम्यान शान बर्फाच्या तुकड्यावर अनवाणी उभा राहिलेला आणि नेहा पायाच्या बोटांवर उभी राहिलेली पाहायला मिळेल.  

व्हॉईस इंडिया किड्सच्या टिमसोबत नेहा कक्कर आणि बादशाह नववर्षाचा कार्यक्रम साजरा करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बादशाह लोकप्रिय चार्टबस्टर मर्सी आणि डीजेवाले बाबू हे गाणे सुरुवातीला सादर करेल; तर नेहा कक्कर तू चिज बडी है मस्त मस्त हे गाणे सादर करणार आहे. हे दोघेही कलाकार लडकी ब्युटिफूल कर गयी चूल या गाण्यावर थिरकताना दिसतील. 

नेहाला याबाबत विचारले असता ती म्हणाली, “व्हॉईस इंडिया किड्सची संकल्पना मला वैयक्तिक खूपच भावली आहे आणि नववर्षानिमित्तच्या खास कार्यक्रमात सहभागी होता आल्याने मला खूपच आनंद होत आहे. मला, वाटतं शोमधील मुले, परीक्षकांसह प्रत्येक जण त्यांचे काम चोखपणे बजावत आहे आणि माझी सर्वात आवडती स्पर्धक आहे नेहा. सर्वच परीक्षक सर्वोत्तम आहेत. मात्र, हिमेश रेशमिया माझे सर्वात आवडते आहेत. कारण, पूर्वी आम्ही दोघेही या शोचे परीक्षक होतो. तेव्हापासून माझे आणि त्यांचे जुने 

Web Title: Jay Bhanushali gave Neha Kakkar and challenge to the King!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.