झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेत सध्या रंजक वळण आले असून विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. नुकताच प्रसारीत झालेल्या भागात विक्रांत राजनंदिनीवर वैतागतो. कारण राजनंदिनी सर्व प्रॉपर्टी आईसाहेब व जयदीपच्या नावावर करते. 

एकीकडे राजनंदिनीने सर्व प्रॉपर्टी आईसाहेब व जयदीपच्या नावावर केल्यामुळे विक्रांतच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. तर दुसरीकडे राजनंदिनी दादासाहेबांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे बेचैन झाली आहे. त्याचदरम्यान सरंजामे बंगल्यात जोगतीण राजनंदिनीला भेटण्यासाठी येते. ती राजनंदिनीला कुणावरही विश्वास ठेवू नकोस, अशी ताकीद देऊन जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रांत सरंजामेंच्या वकीलाकडे जातो आणि प्रॉपर्टीबद्दल विचारू लागतो. तो वकीलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. पण वकील सांगतात की दादासाहेबांनी सांगितले होते कोणतेही प्रॉ़पर्टी कुठल्याही मार्गाने विक्रांतच्या नावावर करता येणार नाही, असा क्लॉज ठेवतात. 


तर घरात छोटा जयदीप दादासाहेब कुठे गेल्याचे विचारतो. त्यावर राजनंदिनी त्याला देवाघरी गेल्याचे सांगते आणि तो रडू लागतो. राजनंदिनीसाठी कुणेतरी बुके आणि चिट्टी पाठवतो. त्यात एका व्यक्तीने दादासाहेबांची हत्या केली असून ते जाणून घेण्यासाठी भेटायला येण्याचे लिहितो. राजनंदिनी त्या माणसाला भेटायला जायचे की नाही या द्विधा मनस्थितीत अडकते. विक्रांत राजनंदिनीला खूश ठेवायचे ठरवतो आणि तिच्यासाठी बुके आणि गिफ्ट घेऊन जातो. पण राजनंदिनी विक्रांतकडील वस्तू न घेताच त्या माणसाला भेटायला जाते. ती कोणाला भेटायला जाते हे पाहण्यासाठी विक्रांत झेंडेना पाठवतो.


राजनंदिनी त्या जागी भेटायला जाते तिथे जालिंदर येतो. जालिंदरच तिला ती चिठ्ठी पाठवतो. यावेळी जालिंदर तिला विक्रांत फ्रॉड असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करतो व त्यानेच दादासाहेबांच्या हत्येचा कट रचला असल्याचा संशय असल्याचे सांगतो. पण राजनंदिनी विक्रांत असे करू शकत नाही, असे सांगून तिथून निघून जाते.

आगामी भागात राजनंदिनी जालिंदरच्या सांगण्यावर विश्वास ठेवेल का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.


Web Title: Jalindar accuses Vikrant of Dadasaheb's murder in Tula Pahate Re
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.