​सारा खानला पाकिस्तानमध्ये चित्रीकरण करताना आला हा विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 05:13 AM2017-09-14T05:13:54+5:302017-09-14T10:43:54+5:30

सारा खान गेल्या कित्येक दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. ती सध्या काय करतेय, कुठे आहे हा प्रश्न तिच्या चाहत्यांना ...

It's a strange experience that Sara Khan got shot in Pakistan | ​सारा खानला पाकिस्तानमध्ये चित्रीकरण करताना आला हा विचित्र अनुभव

​सारा खानला पाकिस्तानमध्ये चित्रीकरण करताना आला हा विचित्र अनुभव

googlenewsNext
रा खान गेल्या कित्येक दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. ती सध्या काय करतेय, कुठे आहे हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिच्या चाहत्यांसाठी आम्ही एक बातमी आणली आहे. त्यांची लाडकी सारा सध्या पाकिस्तानमध्ये असून तेथील काही मालिकांमध्ये काम करत आहे. 
सारा खान गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तानमध्येच होती. आता पाकिस्तानमधील लेकिन या मालिकेचे चित्रीकरण पूर्ण करून ती नुकतीच भारतात परतली आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाचा तिचा अनुभव खूपच चांगला होता. पण पाकिस्तानमध्ये राहात असताना तिला एक वेगळाच अनुभव आला. पाकिस्तानमध्ये मालिकेचे चित्रीकरण झाले की, सारा आजूबाजूच्या परिसरात फिरत असे. तसेच हॉटेलच्या लॉबीमध्ये काही वेळ घालवत असे. याचवेळी तिला एक वेगळ्याच अनुभवाला तोंड द्यावे लागले.
सारा खान ही अतिशय मॉर्डन अभिनेत्री मानली जाते. ती नेहमीच आपल्याला मॉडर्न कपड्यांमध्ये पाहायला मिळते. पाकिस्तानमध्ये असताना हॉटेलच्या रूममध्ये बसून बसून कंटाळा आला म्हणून सारा हॉटेलच्या लॉबीमध्ये फिरत होती. पण तिला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत होते. प्रत्येक जण टक लावून तिच्याकडे पाहात होता. त्यामुळे असे काय होतेय हेच तिला कळत नव्हते. तिला खूपच विचित्र वाटत होते. त्यामुळे तिने तिच्या मालिकेच्या टीमममधील एकाला याबद्दल विचारले. तर तो म्हणाला, पाकिस्तानमध्ये मुली शॉटर्स घालून सार्वजनिक ठिकाणी फिरत नाहीत. हे ऐकून सारा लगेचच तिच्या रूममध्ये गेली आणि कपडे बदलून बाहेर आली. याविषयी सारा सांगते, मुंबईपेक्षा पाकिस्तानचे वातावरण खूपच वेगळे होते. मुंबईत तुम्ही काय घालता याचा कोणालाही फरक पडत नाही. पण पाकिस्तानमध्ये तसे नाहीये. 
सारा खानने याआधी बे कुडी या पाकिस्तानी मालिकेमध्ये देखील काम केले होते. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता.
सारा खान बिदाई या मालिकेमुळे नावारूपाला आली. त्यानंतर ती बिग बॉसमध्ये देखील झळकली. बिग बॉसच्या घरात असताना तिने तिचा प्रियकर अली मर्चंटसोबत लग्न केले होते. पण काहीच महिन्यात तिने आणि अलीने घटस्फोट घेतला. त्यामुळे सारा आणि अलीने हे सगळे पब्लिसिटीसाठी केले असे त्यावेळी म्हटले गेले होते.

Also Read : या कारणामुळे सारा खानला खावी लागली होती पाकिस्तानमध्ये जेलची हवा 

Web Title: It's a strange experience that Sara Khan got shot in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.