बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या रिएलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार पहायला मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार बिग बॉस मराठीच्या घरात जेल दिसणार असल्याचे समजते आहे. 

हिंदी बिग बॉसच्या काही सीजनमध्ये जेल पहायला मिळाले. दर आठवड्याला या कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी स्पर्धक निवडले जातात. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॉस 12मध्ये तर जेलमध्ये जाण्यावरुन आणि जेलमध्ये गेल्यानंतर बरेच वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे या जेलमुळे शो कॉन्ट्रॉवर्शियल कन्टेंट मिळाला होता. हाच विचार करुन बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये या जेलचा प्रस्ताव ठेवला गेला असणार असे टाईम्स नाऊच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 


बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे चित्रीकरण लोणावळ्यात झाले होते. पण यंदाच्या सिझनमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाचे चित्रीकरण हे मुंबई फिल्मसिटी मध्ये होणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा सेट तिथे उभारण्यात येणार आहे. या आधी बिग बॉस मल्याळमचे चित्रीकरण येथे करण्यात आलेले आहे. मुंबईत चित्रीकरण करणे हे सोयीस्कर असल्याने बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या टीमने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.


सर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षक ज्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत असा कार्यक्रम “बिग बॉस मराठी”चा सिझन दुसरा देखील पहिल्या पर्वा प्रमाणेच तितकाच धमाकेदार असेल ज्यात स्पर्धकांमधील वाद- विवाद, चुरस, भांडण, प्रेम, मैत्री असे विविध पैलू बघायला मिळतील.

बिग बॉस मराठी सिझन दुसरा २६ मे संध्या. ७ वा. आणि रोज रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title: It will be seen in the Big Boss house of the Marathi Big Boss
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.