Isha Keskar shared a photo of herself in a bikini, the photo is going viral | ईशा केसकरने शेअर केला बिकनीतला फोटो, फोटो होतोय व्हायरल

ईशा केसकरने शेअर केला बिकनीतला फोटो, फोटो होतोय व्हायरल

ईशा केसकरला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली बानोची भूमिका चांगलीच गाजली होती. ईशा सोशल मीडियावर बराच सक्रीय असते. या माध्यमातून तीआपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असतो. ईशाने नुकताच तिचा बिकनीतील फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

ईशा केसकरने बिकनीतला फोटो शेअर करत लिहिले की, माझ्यासोबत २०२०मध्ये घडलेली चांगली गोष्ट. ईशाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 


ईशा केसकरमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनायाची भूमिका साकारत होती. मात्र काही दिवसानंतर तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन काळात मालिकेचे शूटींग बंद होते. यानंतर तीन महिन्यानंतर मालिकेचे शूटींग सुरु झाले.


याच काळात इशाच्या दाढेचे ऑपरेशन झाले. दाढेचे ऑपरेशन झाल्यामुळे दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणे तिला शक्य होणार नव्हती. तिच्यामुळे मालिकेचे चित्रीकरण लांबवणेही शक्य नव्हते. अखेर तिला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. इशाने व्हिडीओ याची माहिती दिली आहे. ईशा अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Isha Keskar shared a photo of herself in a bikini, the photo is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.