Viral Memes : अच्छे शो को डेली सोप बना दिया...! ‘इंडियन आयडल 12’वर पुन्हा भडकले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 02:11 PM2021-06-20T14:11:59+5:302021-06-20T14:12:56+5:30

Indian Idol 12 : मीम्स व्हायरल ... ‘इंडियन आयडल 12’ हा शो गेल्या काही दिवसांपासून सतत वादत आहेत. आता पुन्हा एकदा हा रिअ‍ॅलिटी शोवर चाहत्यांनी भडास काढली आहे.

indian idol 12 users slams judges and says following the footsteps of a daily soap shares hilarious memes | Viral Memes : अच्छे शो को डेली सोप बना दिया...! ‘इंडियन आयडल 12’वर पुन्हा भडकले लोक

Viral Memes : अच्छे शो को डेली सोप बना दिया...! ‘इंडियन आयडल 12’वर पुन्हा भडकले लोक

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही आठवड्यांपासून शोची स्पर्धक शन्मुखप्रिया हिलाही असेच ट्रोल केले जातेय. लोक तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत.

‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) हा शो गेल्या काही दिवसांपासून सतत वादत आहेत.  नवा एपिसोड टेलिकास्ट झाला रे झाला की, ‘इंडियन आयडल 12’चे ट्रोलिंग सुरू होते. आता पुन्हा एकदा हा रिअ‍ॅलिटी शोवर चाहत्यांनी भडास काढली आहे. (Indian Idol 12 users slams judges )
शनिवारी प्रसारित ‘इंडियन आयडल 12’चा एपिसोड फादर्स डे स्पेशल होता. सर्व स्पर्धकांनी आपआपल्या पित्यासाठी गाणी गायलीत. पण हा एपिसोड पाहून लोक भडकले. कारण काय तर ओव्हर ड्रामा. होय,   सर्व स्पर्धकांचे वडिल या एपिसोडमध्ये हजर होते. त्यांनी स्टेजवर अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्या ऐकून शोचे जज कमालीचे भावुक झालेत. अनु मलिक, हिमेश रेशमिया आणि सोनू कक्कर ढसाढसा रडताना दिसले. पण नेटक-यांनी याला ‘ओव्हर ड्रामा’चे नाव दिले. पाठोपाठ ट्विटरवर ‘इंडियन आयडल 12’वरचे अनेक मीम्स व्हायरल झालेत. ‘इंडियन आयडल 12’ला मेकर्सनी डेली सोप बनवलेय, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्यात. या सगळ्या इमोशनल स्टोरी केवळ टीआरपी मिळवण्यासाठी केलेला ड्रामा आहे, असे मत अनेकांनी नोंदवले.  

 

गेल्या काही आठवड्यांपासून शोची स्पर्धक शन्मुखप्रिया हिलाही असेच ट्रोल केले जातेय. लोक तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत.
‘इंडियन आयडल 12’ सुरु झाले तेव्हा नेहा, विशाल व हिमेश या शोचे जज होते. पण गेल्या काही दिवसांपासून शोमध्ये सतत जजेसची अदलाबदली सुरू आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यावर शोचा सेट दमणला हलवण्यात आला आणि इथे जाण्यास नेहा व विशालने नकार दिला. यानंतर काही दिवस अनु मलिक व मनोज मुंतशीर यांनी शो जज केला. गेल्या काही दिवसांपासून हिमेश शोमध्ये परतला आहे. पण नेहा व विशालचा पत्ता नाही. चर्चा खरी मानाल तर विशालचा शोमध्ये परतण्याचा आता कुठलाही इरादा नाही.  

Web Title: indian idol 12 users slams judges and says following the footsteps of a daily soap shares hilarious memes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.