Indian Idol 12 पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल अडकले लग्नबेडीत?, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 01:20 PM2021-10-09T13:20:07+5:302021-10-09T13:20:54+5:30

पवनदीप राजन - अरुणिता कांजीलाल दोघांचे नव्या जोडप्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Indian Idol 12 Pawandeep Rajan and Arunita Kanjilal stuck in a wedding bed ?, Photo goes viral | Indian Idol 12 पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल अडकले लग्नबेडीत?, फोटो होतोय व्हायरल

Indian Idol 12 पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल अडकले लग्नबेडीत?, फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२वा सीझन खूप चर्चेत आला होता. या शोमधून अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने संपूर्ण देशाला भुरळ पाडली होती. तसेच या शोमध्ये या दोघांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली होती. 'इंडियन आयडॉल' शो संपल्यानंतर देखील त्यांची चर्चा कायम आहे. आता देखील अरुणिता आणि पवनदीप पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याला आता कारणही तसे खास आहे. सध्या अरुणिता आणि पवनदीपचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दोघे नव्या जोडप्याप्रमाणे दिसत आहे. 

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अरुणिता कांजीलाल लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये तर पवनदीप शेरवानीमध्ये दिसतो आहे. दोघांच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. काही चाहत्यांनी पवनदीप आणि अरुणिताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी मात्र एडिटिंग उत्तम प्रकारे केली असल्याचे म्हटले आहे. तर अरुणिता आणि पवनदीपच्या चाहत्यांनी खरेच लग्न करणार का? असा प्रश्न देखील विचारला आहे. 


दरम्यान या फोटोवर अरुणिता आणि पवनदीपने याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल या दोघांची ओळख 'इंडियन आयडल' शोमध्ये झाली. तेव्हा त्यांच्या लव्ह अँगलची चर्चादेखील रंगताना दिसली. आता शो संपला असूनही दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

Web Title: Indian Idol 12 Pawandeep Rajan and Arunita Kanjilal stuck in a wedding bed ?, Photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.