Indian Idol 12: अरुणिता कांजीलालच्या नाही तर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात आहे पवनदीप राजन, नाव वाचून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 05:09 PM2021-09-27T17:09:20+5:302021-09-27T17:09:57+5:30

इंडियन आयडॉलचा १२वा सीझन संपल्यानंतर पवनदीप आणि अरुणिता दोघेही त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत.

Indian Idol 12: Pavandeep Rajan is in love not with Arunita Kanjilal but with 'Yaa' actress. | Indian Idol 12: अरुणिता कांजीलालच्या नाही तर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात आहे पवनदीप राजन, नाव वाचून व्हाल हैराण!

Indian Idol 12: अरुणिता कांजीलालच्या नाही तर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात आहे पवनदीप राजन, नाव वाचून व्हाल हैराण!

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलचा १२वा सीझन नुकताच संपला. हा सीझन खूप चर्चेत आला. या सीझनचा विजेत पवनदीप राजन ठरला. 'इंडियन आयडल 12' पवनदीप राजनने जिंकला होता. तर अरुणिता कांजीलाल या सीझनची पहिली उपविजेती ठरली. शो संपल्यानंतर पवनदीप आणि अरुणिता दोघेही त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत.

इंडियन आयडॉलचा १२वा सीझन खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये खूप कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली होती. त्यानंतर अरुणिता आणि पवनदीपच्या मैत्रीच्या आणि लिंकअपच्या चर्चा होताना दिसल्या. इतकेच नाही तर शो संपल्यानंतरही आता त्यांच्या अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळतात. या शोनंतर देखील अनेक ठिकाणी हे दोघेही एकत्र स्पॉट झाले. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील या दोघांच्या रिलेशनशीपविषयी खूप चर्चा सुरू आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये पवनदीपने तो माधुरी दीक्षितचा खूप मोठा चाहता असल्याचे सांगितले.  माधुरी दीक्षितचा त्याची सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे, असेही तो म्हणाला.


मुळचा उत्तराखंड चंपावतमधील असलेल्या पवनदीपला बालपणापासूनच गायनाची आवड होती. पवनदीप हा 'इंडियन आयडॉल १२'मधील असा एकमेव स्पर्धक आहे. ज्याला गायनासोबतच जवळ-जवळ सगळी वाद्येदेखील वाजवता येतात. त्याचे वडील सुरेश राजन आणि काका सतीश राजन यांनी लहानपणापासूनच त्याला संगीत शिकवले.


२००५ मध्ये 'द वॉईस ऑफ इंडिया' हा शो जिंकल्यानंतर खऱ्या अर्थाने पवनदीपच्या करिअरला नवीन दिशा मिळाली. पवनदीपने काही मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनाचे काम केले आहे. खरेतर पवनदीप आणि अरुणिताने खऱ्या आयुष्यातही एकत्र यावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र ते दोघे एकमेकांना चांगले मित्र मानतात.

 

Web Title: Indian Idol 12: Pavandeep Rajan is in love not with Arunita Kanjilal but with 'Yaa' actress.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.