Indian Idol 12: पवनदीप राजनवर झाला हा अन्याय म्हणत निर्मात्यांवर भडकले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 08:13 PM2021-06-14T20:13:40+5:302021-06-14T20:14:04+5:30

इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांना पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.

Indian Idol 12: Fans angry at producers saying that injustice was done to Pawandeep Rajan | Indian Idol 12: पवनदीप राजनवर झाला हा अन्याय म्हणत निर्मात्यांवर भडकले चाहते

Indian Idol 12: पवनदीप राजनवर झाला हा अन्याय म्हणत निर्मात्यांवर भडकले चाहते

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२चा स्पर्धक पवनदीप राजनचा आवाज लोकांना खूप भावतो. चाहते पवनदीप राजनचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी इंडियन आयडॉल १२ पाहतात. मागील काही दिवसांपूर्वी इंडियन आयडॉल १२मध्ये हिमेश रेशमियाला ट्रिब्युट दिले होते. यादरम्यान इंडियन आयडॉल १२चे स्पर्धक हिमेश रेशमियाचे सुपरहिट गाणी गाताना दिसले होते. इंडियन आयडॉल १२च्या मागील भागात प्रत्येक स्पर्धकाने हिमेश रेशमियाची दोन-तीन गाणी गायली पण पवनदीप राजनच्या बाबतीत काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले.


इंडियन आयडॉल १२च्या मागील भागात पवनदीप राजन फक्त एकच गाणे गाताना दिसला. पवनदीप राजनने सलमान खानचे सुपरहिट गाणे तेरे नाम गायले होते. यादरम्यान चाहत्यांनी इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांना ट्रोल करायला सुरूवात केली. चाहत्यांचा दावा आहे की, इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांनी जाणूनबुजून पवनदीप राजनदीपच्या परफॉर्मन्सवर कैची लावली आहे.


इंडियन आयडॉल १२मध्ये पवनदीप राजनने फक्त एकच गाणे गायले. इतकेच नाही तर निर्मात्यांनी पवनदीप राजनचे कमेंट्सदेखील कट केल्याचे पहायला मिळाले. मागील भागात परीक्षक, पवनदीप राजनचे कौतुक करतानाही दिसले नाही. इंडियन आयडॉल १२चा एपिसोड ऑन एअर झाल्यानंतरच निर्माते फॅन्सच्या निशाण्यावर आले आहेत.


एका युजरने म्हटले की, या लोकांना हे माहित नाही की पवनदीप राजनमुळेच इंडियन आयडॉल १२ चालत आहे. बाकी सर्व सिंगर्स तर ओरडत असतात. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, इंडियन आयडॉल १२ वाले तुम्ही बिझनेस केला नाही पाहिजे. ज्या व्यक्तीमुळे शोला यश मिळते आहे कमीत कमी त्याचा आदर तरी करा. पवनदीप राजनला ३ मिनिटांच्या जागी फक्त ९० सेकंदच दिले गेले.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंडियन आयडॉलचा १२वा सीझन वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतो आहे.

Web Title: Indian Idol 12: Fans angry at producers saying that injustice was done to Pawandeep Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.