Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 11:00 AM2021-08-15T11:00:00+5:302021-08-15T11:00:00+5:30

इंडियन आयडॉल १२चा आज अंतिम सोहळा पार पडणार आहे.

Indian Idol 12: This celebrity will be present at the final ceremony, new host will appear with Aditya Narayan | Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक

Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक

googlenewsNext

लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉल अंतिम टप्प्यात पोहचला असून आज या शोचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. या शोचा विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे. या शोचा ग्रॅण्ड फिनाले सलग १२ तास चालणार आहे. या शोच्या अंतिम सोहळ्याचे टॉप ६ फायनलिस्टमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. यात पवनदीप राजन, अरूणिता कांजीलाल, मोहम्मद दानिश, सायली कांबळे, निहाल तौरो आणि शनमुख प्रिया यांचा समावेश आहे.

इंडियन आयडॉलच्या अंतिम सोहळ्यात तब्बल १२ सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. शेरशाह चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. इतकेच नाही तर कुमार सानू, मिका सिंग, जावेद अली, अलका याग्निक, उदित नारायण, सलमान अली आणि सनी हिंदुस्तानी दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विजय देवरकोंडादेखील हजेरी लावणार आहे. त्याच्या बिझी शेड्युलमुळे तो तिथे उपस्थित असणार नाही पण तो व्हिडीओ कॉलमधून हजेरी लावणार आहे.

टेली चक्करच्या रिपोर्टनुसार, साउथचा मेगास्टार चिरंजीवीदेखील हजेरी लावणार आहे. तर द ग्रेटी खलीदेखील या शोच्या अंतिम सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे समजते आहे.


इंडियन आयडॉल १२च्या अंतिम सोहळ्यासाठी आदित्य नारायणसोबत जय भानुशालीदेखील सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनचा अंतिम सोहळा तब्बल १२ तास चालणार आहे. प्रेक्षक या वादग्रस्त आणि चर्चेत आलेल्या १२व्या सीझनचा विजेता कोण ठरणार आहे, हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे.

Web Title: Indian Idol 12: This celebrity will be present at the final ceremony, new host will appear with Aditya Narayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.