Indian Idol 12: अरूणिता कांजीलालनं गायलं रानू मंडलचं गाणं, हिमेश रेशमियानं दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:20 PM2021-06-11T12:20:51+5:302021-06-11T12:21:22+5:30

इंडियन आयडॉल १२च्या आगामी भागात अरूणिता कांजीलालने रानू मंडलने गायलेले गाणे तेरी मेरी कहानी या गाण्यावर परफॉर्मन्स देताना दिसणार आहे.

Indian Idol 12: Arunita Kanjilal sings Ranu Mandal's song, Himesh Reshammiya's reaction | Indian Idol 12: अरूणिता कांजीलालनं गायलं रानू मंडलचं गाणं, हिमेश रेशमियानं दिली ही रिअ‍ॅक्शन

Indian Idol 12: अरूणिता कांजीलालनं गायलं रानू मंडलचं गाणं, हिमेश रेशमियानं दिली ही रिअ‍ॅक्शन

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी सिंगिंग शो इंडियन आयडॉलचा बारावा सीझन सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येतो आहे. या शोवर सोशल मीडियावर बरीच टीका होताना दिसते आहे. मात्र या शोचा आगामी भाग हिमेश रेशमिया स्पेशल असणार आहे. या भागात नेहा कक्करची बहिण सोनू कक्कर स्पेशल गेस्ट बनून येणार आहे. या भागातील सर्व स्पर्धक हिमेश रेशमियाच्या दमदार गाण्यावर परफॉर्मन्स देताना दिसणार आहेत. या दरम्यान अरूणिता कांजीलालने रानू मंडलने गायलेले गाणे तेरी मेरी कहानी या गाण्यावर परफॉर्मन्स देताना दिसणार आहे.

इंडियन आयडॉल १२ची स्पर्धक अरूणिता कांजीलालने तेरी मेरी कहानी या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. तिचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहून लोकांना रानू मंडलची आठवण आली. अरूणिताचे गाणे ऐकून सर्वजण चकीत झाले.

तर हिमेश रेशमिया तर थक्कच झाला होता. त्याने तिच्या परफॉर्मन्सनंतर तिला कमेंटमध्ये म्हटले की हे पूर्ण गाणे फिमेलचे नाही आहे. पण तू माइंडब्लोइंग गायले आहेस. अरूणिताचे गाणे ऐकून हिमेशच नाही तर अनू मलिकदेखील चांगलेच इंप्रेस झालेले पहायला मिळाले. 


तर सायली कांबळेने क्योंकी इतना प्यार तुमको करते है सनम या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. तिचे गाणे ऐकताना हिमेशला अश्रू अनावर झाले. त्याने तिचे गाणे  मनाला भिडले अशी कमेंट केली. 

Web Title: Indian Idol 12: Arunita Kanjilal sings Ranu Mandal's song, Himesh Reshammiya's reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.