नोराला भेटण्यासाठी खुर्ची सोडून धावत गेला टेरेन्स, भारती म्हणाली - जणू कोरोना वॅक्सीन आली....

By अमित इंगोले | Published: October 22, 2020 03:59 PM2020-10-22T15:59:09+5:302020-10-22T16:01:24+5:30

व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की या दसऱ्याला नोरा फतेही इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये एन्ट्री घेईल. नोराला बघण्यासाठी टेरेन्स लुईस आपली खुर्ची सोडून धावत जाताना दिसला.

India best dancer : Nora Fatehi on show Terence Lewis video corona vaccine | नोराला भेटण्यासाठी खुर्ची सोडून धावत गेला टेरेन्स, भारती म्हणाली - जणू कोरोना वॅक्सीन आली....

नोराला भेटण्यासाठी खुर्ची सोडून धावत गेला टेरेन्स, भारती म्हणाली - जणू कोरोना वॅक्सीन आली....

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर नोरा फतेहीच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. नोराचे फॅन्स तिला पुन्हा एकदा इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर बघू शकणार आहेत. नोरा दसरा स्पेशन एपिसोडमध्ये येणार आहे. नुकताच या एपिसोडचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला. ज्यात शोमधील सगळेच तिला भेटून आनंदी दिसले. 

व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की या दसऱ्याला नोरा फतेही इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये एन्ट्री घेईल. नोराला बघण्यासाठी टेरेन्स लुईस आपली खुर्ची सोडून धावत जाताना दिसला. यावर भारतीने त्याला चिमटा काढला. भारती म्हणाली की, टेरेन्स सर असे पळत-धावत आले की जसे की कोरोना वॅक्सीन आली आपल्या सेटवर. त्यानंतर नोरा फतेही, टेरेन्स लुईस आणि मलायका अरोरा सोबत डान्स करताना दिसले. (VIDEO : नोरा फतेही आणि गुरू रंधावाचं धमाकेदार Naach Meri Rani गाणं रिलीज, तिचा वेगळा अंदाज पाहून फॅन्स फिदा...)

दरम्यान, मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस जज आहेत. काही आठवड्यांपूर्वी मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह आली होती. ज्यामुळे काही दिवसांसाठी नोरा जज म्हणून दिसली होती. शोमध्ये जोपर्यंत नोरा होती तोपर्यंत टेरेन्स तिच्यासोबत फ्लर्ट करताना दिसला होता. नोराच्या येण्याने शोचा टीआरपीही वाढला होता. मलायका परत आल्यावर नोराला शो सोडावा लागला होता. (VIDEO : ना स्टेज ना पब्लिक नोरा पार्कमध्येच करू लागली जबरदस्त डान्स, फॅन्सची उडाली झोप!)

नोराचा पंजाबी रॅपर गुरू रंधावासोबतचा एक नवा म्युझिक व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या म्युझिक व्हिडीओचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. हे गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात नोराचा वेगळा अंदाज म्हणजे ती रोबोटच्या रूपात दिसणार आहे. 
 

Web Title: India best dancer : Nora Fatehi on show Terence Lewis video corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.