लग्नसोहळा म्हटला की आपल्या भारतीयांसाठी तसा हा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे लग्नसोहळ्याचे महत्त्व मालिका आणि सिनेमातही खूप आहे. विवाह सोहळ्यांवर आधारित नवीन मालिका 'नये शादी के सियापे' लवकरच छोट्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेमध्‍ये लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता विपुल रॉय असणार आहे. जो पुन्‍हा एकदा विनोदीशैलीमध्‍ये प्रवेश करत आहे. तो ओंगळ, गर्विष्‍ठ, विलक्षण व चतुर स्‍ट्रीट-स्‍मार्ट मुलगा बंटीची भूमिका साकारणार आहे. तो बोलण्‍यात पटाईत असून तो त्‍याच्‍याच तो-यात राहतो.

 


विपुल हा अत्‍यंत आनंदी आहे . नुकतेच त्याने प्रेयसी मेलिस अॅटिसीसोबत साखरपुडा केला आहे. तो लवकरच विवाह बंधनात अडकरणार आहे आणि मालिकेमध्‍ये वेडिंग प्‍लानरची भूमिका साकारत असल्‍यामुळे त्‍याला त्‍याच्‍या स्‍वत:च्‍या  लग्नाची तयारी करण्‍यासाठी ही संधीच मिळाली आहे. 


विपुल त्याच्या या खास ड्रीम प्लान विषयी म्‍हणाला, ''मी साकारलेल्‍या विविध भूमिकांमध्‍ये वेडिंग प्‍लानरची भूमिका सर्वात अनोखी आहे. प्‍लानरच्‍या कामाने मला नेहमीच आकर्षून घेतले आहे आणि एक मोठा विवाह सोहळा करण्‍यामागील मेहनत जाणून घेण्‍याची माझी नेहमीच इच्‍छा होती. 
'नये शादी के सियापे'च्‍या माध्‍यमातून मला आकर्षक भूमिका साकारण्‍यासह विवाहाच्‍या तयारीबाबत भरपूर काही माहिती करून घेण्‍याची देखील संधी मिळाली. मी निश्चितच ही माहिती व अनुभवाचा उपयोग माझ्या स्‍वत:च्‍या विवाहासाठी करणार आहे आणि माझा विवाह लवकरच पार पडणार आहे. आशा करतो की, मी ते अगदी सराईतपणे पार पाडेन .''

 

विविध प्रकारचे विवाह सोहळे आणि वेडिंग प्‍लानर्सना या अशक्‍य विवाहांना शक्‍य करण्‍यामध्‍ये सामना कराव्‍या लागणा-या असामान्‍य लुप्‍त आव्‍हानांना दाखवणारी आगामी मालिका 'नये शादी के सियापे' ही हलकी-फुलकी आणि हसवून-हसवून लोटपोट करणारी आहे. ही मालिका कॉमेडी ट्विस्‍टसह गोंधळाच्‍या भारतीय विवाह सोहळ्यांच्‍या वातावरणाला दाखवते. या मालिकेमध्‍ये शाहबाज खान मुबारक खानची भूमिका साकारताना दिसणार आहे. मुबारक खान गतकाळातील प्रेमासंबंधी वेदनांमुळे विपुल रॉय आणि नेहा बग्‍गा ऊर्फ बबली यांच्‍या सोबतीने विवाह समूह बनवत प्रेमीयुगुलांना एकत्र आणण्‍याचा प्रयत्‍न करतो.
 


Web Title: I intend to be my own wedding planner, says Vipul Roy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.