Hina khans Fan Moment With Priyanka Chopra And Nick Jonas | प्रियंका चोप्रासोबतच्या या सेल्फीमुळे हिना खानवर केली या प्रोड्युसरने टीका, तर टीव्ही सेलेब्सने दिले असे उत्तर
प्रियंका चोप्रासोबतच्या या सेल्फीमुळे हिना खानवर केली या प्रोड्युसरने टीका, तर टीव्ही सेलेब्सने दिले असे उत्तर

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून घराघरात पोहचलेली अक्षरा बहू म्हणजे हिना खान सध्या चर्चेत आली आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे तिचा हा खास फोटो. त्याचे झाले असे की, नुकतेच कान्स फेस्टीव्हलमध्ये हिना खानसह इतरही कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या सगळ्यात हिना खानच्या सेल्फीने सा-यांचे लक्ष वेधून घेतल आहे. त्याला कारण म्हणजे हिनाने प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सह फोटो क्लिक केला आहे. तिने हा तिचा फॅन मोमेंट सोशल मीडियावर शेअर होताच सारे संमिश्र प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

प्रियंकासह हिनाची ही खास  भेटीची आठवण सदैव जवळ असावी म्हणून कॅमे-यात क्लिक करत आपला हा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. विशेष म्हणजे प्रियंका सोबत यावेळी तिचा पती निक जोनासही होती त्यामुळे हिनाचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता तर दुसरीकडे ''कान्स फेस्टीव्हल अचानक चांदिवलीचा स्टुडिओ कसा बनला'' अशा कमेंटसही हिनाच्या या फोटोंवर येत होत्या यावेळी इतर टीव्ही कलाकारांनीही हिनाची बाजू सांभाळत चागलेच खडे बोल नेटीझन्सना सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. 

कान्सनंतर हिना बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत मिलान येथे गेली आहे. तिथले तिने फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे हिनाचे ड्रीम व्हॅकेशन आहे. या फोटोंमध्ये ती रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहे.


Web Title: Hina khans Fan Moment With Priyanka Chopra And Nick Jonas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.