ब-याचदा कलाकारांना जीव जोखमीत टाकून त्यांचे शूटिंग पूर्ण करावे लागते. मात्र कधी कधी कामासाठी घेतलेली त्यांची हीच रिस्क त्यांच्या जीवाशी येते. असेच काहीसे अभिनेत्री हिना खानबरोबर घडले आहे. टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की 2' च्या सेटवर शूटिंगदरम्यान आग लागली आणि आगीच्या कचाट्यात हिना खानचा हात भाजला. हिना एका सीक्वेंसचे शूटिंग करत होती आणि त्याचदरम्यानच तिचा हात जळाला. तातडीने हिनाला वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने तिच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. 

 

हिना आजही 'अक्षरा बहु' याच नावाने ओळखली जाते. 'ये रिश्ता क्या कहलाता है'  मालिकेतील हिनाने साकारलेली 'अक्षरा' या भूमिकेला रसिकांनी तुफान पसंती दर्शवली होती. जवळपास  8 वर्षे तिने या मालिकेतून रसिकांचे मनोरंजन केले. हिनाने काही वर्षानंतर ही मालिका सोडली आणि 'बिग बॉस 11' मध्येही झळकली.

 

 

'खतरों के खिलाडी' या शोमध्येही तिचा बेधडक अंदाज रसिकांना चांगलाच भावला. तिची लोकप्रियता पाहाता एकता कपुरच्या 'कसौटी जिंदगी की ' 2 सिझन या मालिकेतही तिने एंट्री केली. या मालिकेत ती कोमोलिका हे निगेटीव्ह शेड असलेले पात्र साकारत आहे. या भूमिकेलाही रसिकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. 

हिना खान झळकणार बॉलिवूडमध्ये !


हिना खानला आता बॉलिवूड सिनेमात झळकण्याची इच्छा आहे. त्यामुळेच ती आता छोट्या पडद्यावर झळकणार नसून बॉलिवूड सिनेमात झळकणार असल्याची माहिती मिळते. तिला बड्या बॅनरच्या सिनेमाची लॉटरी लागली असल्याचेही बोलले जात आहे. त्यानुसार ती खूप मेहनतही घेत असल्याचे सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट व्हिडीओ पाहून स्पष्ट होते.  

 


Web Title: Hina Khan injured in 'Kasati Zindagi ki 2' set
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.