टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये हिना खानचाही समावेश आहे. अल्पावधीतच तिने खूप लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर यावर्षी तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील हजेरी लावली होती. त्यानंतर नुकतीच ती न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या इंडिया डे परेडमध्ये सहभागी झाली होती. तिथले तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती भारताचा तिरंगा फडकावताना दिसते आहे. 

हिना पहिली टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे जिला न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडमध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. हिनाने न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या इंडिया डे परेडमधील फोटो सोशल मी़डियावर शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने म्हटलं की, भारतीय असल्याचा मला गर्व आहे. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना मला विशेष आनंद होत आहे. खासकरुन तेव्हा, ज्यावेळी जगातील सर्वात सामर्थ्यशाली देशामध्ये आपल्या देशाचा झेंडा गौरवाने फडकविण्याची संधी मिळते.


हिनाच्या या फोटोंवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

या परेडमध्ये हिना व्यतिरिक्त गुलशन ग्रोव्हर व सुनील शेट्टीने हजेरी लावली होती. 


वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर हिना खान शेवटची एकता कपूरची मालिका कसौटी जिंदगी कीमध्ये दिसली होती. या मालिकेत तिने खलनायिका कोमोलिकाची भूमिका साकारली होती.

सध्या ती चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hina Khan hoists the National flag at India Day Parade in New York. See pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.