स्टार प्लस वाहिनीवरील ‘द व्हॉइस’ हा कार्यक्रम आता अंतिम फेरीच्या टप्प्यावर असून दिवसेंदिवस त्याची उत्सुकता वाढत चालली आहे. कार्यक्रमात सुपर गुरूचे पद भूषविणारे महान संगीतकार ए. आर. रेहमान हे आता कार्यक्रमात पुन्हा परतले आहेत. ते आता अंतिम फेरीतील चार स्पर्धकांच्या निवडीत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. कार्यक्रमातील एक प्रशिक्षक हर्षदीप कौर हिचा शिष्य असलेला सुमित सैनी या स्पर्धकाने आपल्या अप्रतिम आवाजाने सर्वच प्रशिक्षक आणि सुपरगुरूंवर आपली छाप पाडली आहे. यावेळी सुमितने ‘तुझमें रब दिखता है’ हे गाणे गाऊन आपली गुरू हर्षदीप कौर हिला स्वरांजली वाहिली, तेव्हा हर्षदीप काहीशी भावनावश झाली आणि तिचे डोळे पाणावले.


या कार्यक्रमाच्या निर्मिती टीमशी जवळचे संबंध असेलल्या एका सूत्राने सांगितले, सुमित सैनीने ‘छैय्या छैय्या’ हे गीत गाऊन आपल्या अप्रतिम आवाजाने पुन्हा एकदा सर्वांवर आपली जादू टाकली. त्याच्या अप्रतिम आवाजाची स्वत: सुपरगुरू ए. आर. रेहमान यांनी प्रशंसा करताना सांगितलं की हे गाणं तसं गुंतागुंतीचे असले, तरी सुमितने ते अगदी विनासायास निर्दोष गायले आणि त्याला पूर्ण न्याय दिला.

प्रशिक्षक हर्षदीप कौर हिनेही आपल्याला सुमितचा किती अभिमान वाटतो ते सांगून त्याच्या गाण्याची प्रशंसा केली. यामुळे आनंदित झालेल्या सुमितने हर्षदीपबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुझमे रब दिखता है हे गाणे गायले आणि त्यातील भावना या आपल्यासाठी आहेत, असे तो म्हणाला. त्याचे हे गाणे ऐकून आणि त्याच्या आपल्याबद्दलच्या भावना समजल्यामुळे हर्षदीपही भावनावश झाली आणि तिचे डोळे पाणावले.


स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’मधील प्रशिक्षक हर्षदीपचे तिच्या शिष्यांशी असलेले नाते या प्रसंगात अचूक दिसून येते.

स्पर्धकांच्या एकापेक्षा एक बहारदार सादरीकरणामुळे आणि प्रशिक्षकांच्या गंमतीजमतींमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकत चालला आहे.


Web Title: Harshdeep Kaur gets teary-eyed on The Voice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.