Gurunath makes a new plan to takeover Radhika's company in Mazhya Navryachi Bayko | 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये गुरूनाथने राधिकाचा कंपनीतून पत्ता कट करण्यासाठी रचला हा प्लान
'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये गुरूनाथने राधिकाचा कंपनीतून पत्ता कट करण्यासाठी रचला हा प्लान

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. नुकत्याच या मालिकेच्या प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये गुरूनाथ केडीसोबत नवीन प्लानबद्दल चर्चा करतो. त्यात तो राधिकाची कंपनी स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी कट रचतो.

गुरूनाथला राधिका मसाले कंपनीचा सीईओ बनायचे असते आणि त्यासाठी त्याची धडपड सुरू असते. पण, त्याला समजते कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंगमध्येदेखील राधिकाला शेतकऱ्यांसाठी जमविलेला पैशांची चोरी झालेली नसून हा घोटाळा सिद्ध करण्यासाठी दोन मुदत दिली जाते. त्यामुळे गुरूनाथ आता वेगळा कट रचतो. तो केडीला त्याचा प्लान सांगताना म्हणतो की, आता राधिकाला मी चांगला माणूस बनतो, असे वचन देतो आणि तिला कंपनी माझ्या नावावर करायला सांगतो. त्यावर केडी त्याला म्हणतो की राधिका अजिबात सहमती देणार नाही. केडीच्या म्हणण्यावर गुरूनाथ त्याला राधिका कशी इमोशनल फुल असल्याचे सांगतो आणि हे केडीलाही पटते.   


दुसरीकडे राधिका सौमित्रला ऑफिसमध्ये पत्रकार परीषदेचे आयोजन करायला सांगते. पण, सौमित्र तिला सांगतो की, चोर मीडियासमोर येण्यास तयार नाही आणि त्याचा गुन्हा सर्वांसमोर कबूल करणार नाही. गुरूनाथ तितक्यात घरी येतो आणि तो राधिका सौमित्र यांच्यातील संभाषण ऐकतो. त्यानंतर गुरूनाथ राधिकाला पाठिंबा देत चोराला पकडून आणतो आणि चोरलेले पैसे परत घेऊन येतो असे सांगतो. 


केडीच्या घरी, शनाया तिच्या आईशी बोलताना गुरूनाथला सपोर्ट करते. ती सांगते की गुरूनाथने माझ्या वरील प्रेमापोटी पोपटरावला मारहाण केली. तरीदेखील तिची आई तिला पोपटरावशी लग्न करण्याचा सल्ला देते. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका गुरूनाथच्या आई वडीलांचा आशीर्वाद घेऊन पत्रकार परिषदेसाठी जाते. त्यावेळी गुरूनाथ देखील तिच्याशी प्रेमाने बोलतो आणि तिला गुड लक देतो. भागाच्या शेवटी गुरूनाथ केडीच्या घरी पोहचतो आणि शनायाची माफी मागतो. गुरूनाथ सुभेदारचा नवीन प्लान यशस्वी होतो की नाही, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.


Web Title: Gurunath makes a new plan to takeover Radhika's company in Mazhya Navryachi Bayko
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.