इंडियन आयडलच्या सेटवर गोविंदा आणि स्मिता ठाकरेने लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 11:55 AM2017-02-23T11:55:24+5:302017-02-23T17:25:24+5:30

इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनची चांगलीच चर्चा आहे. यंदाच्या सिझनमधील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज खूपच चांगले आहेत. त्यामुळे कोण ...

Govinda and Smita Thackeray lavali muster on Indian Idol set | इंडियन आयडलच्या सेटवर गोविंदा आणि स्मिता ठाकरेने लावली हजेरी

इंडियन आयडलच्या सेटवर गोविंदा आणि स्मिता ठाकरेने लावली हजेरी

googlenewsNext
डियन आयडल या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनची चांगलीच चर्चा आहे. यंदाच्या सिझनमधील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज खूपच चांगले आहेत. त्यामुळे कोण विजेता ठरणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. प्रत्येक भागात सगळेच स्पर्धक खूप चांगले परफॉर्मन्स देत आहेत आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनचे परीक्षण फरहा खान, सोनू निगम आणि अन्नू मालिक करत आहे. या तिघांनी इंडियन आयडलच्या पहिल्या सिझनमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली होती. इंडियन आयडलच्या आतापर्यंतच्या सगळ्या सिझनमध्ये पहिला सिझन हा सगळ्यात हिट ठरला होता. या सिझनच्या स्पर्धकांच्या आवाजासोबतच या तिघांच्या परीक्षणाचेदेखील सगळीकडे कौतुक करण्यात आले होते. 
इंडियन आयडलमध्ये फरहा, सोनू आणि अनू हे तिघे परीक्षकाच्या भूमिकेत असले तरी दर आठवड्याला काही गेस्ट परीक्षक प्रेक्षकांना पाहायला मिळतात. पुढील एका भागात अभिनेता गोविंदा झळकणार आहे. या भागाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. यावेळी गोविंदासोबत त्याची पत्नी सुनितादेखील उपस्थित होती. गोविंदा या सेटवर असताना या सेटवर निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी अचानक भेट देऊन सगळ्यांना सरप्राइज दिले. सँडविच, हसिना मान जाएंगी अशा त्यांनी निर्मिती केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये गोविंदा झळकला आहे. त्यामुळे गोविंदा आणि स्मिता यांची मैत्री खूपच चांगली आहे. त्यामुळे आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून स्मिताने या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावली होती. सेटवर आल्यावर स्मिता यांनी गोविंदा आणि त्याच्या पत्नीसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. तसेच इंडियन आयडलचे परीक्षक फरहा, अनू आणि सोनू यांच्यासोबतदेखील काही वेळ घालवला. 

Web Title: Govinda and Smita Thackeray lavali muster on Indian Idol set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.