सोनी सब वाहिनीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार असल्याचं समजतं आहे. दयाबेन म्हणजेच दिशा वकानी मालिकेत परतणार असल्याचं जेठालालनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवा खुलासा केला आहे. ज्यामळे त्यांच्या चाहत्यानी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

जेठा लाल म्हणजेच दिलीप जोशीने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मला माहीत नाही पण काहीही होऊ शकतं. दिशा तिच्या भूमिकेत परत येऊ शकते. मला अशा आहे की, ती परत येईल.

दिलीप जोशी पुढे म्हणाला, दिशा परत आली नाही तर मी नव्या दयाबेनसोबत काम करायलाही तयार आहे. यावरुन दयाबेनची एन्ट्री होणार हे नक्की मात्र नव्या चेहऱ्याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.


दयाबेन म्हणजेच दिशा वकानी मॅटर्निटी लिव्हवर आहे. मागच्या बऱ्याच काळापासून ती परत येणार की नाही यावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या. तसेच तिने मालिकेत काम करण्यासाठी मानधनात वाढ केल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र तिची ही मागणी निर्मात्यांनी अमान्य केली.


तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या ११ वर्षांपासून सुरू आहे. या मालिकेत दिशा वकानी मुख्य भूमिकेत आहे. दिशा मालिकेत कधी पहायला मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.


Web Title: Good News ..! Dayaben's entry in 'Tarak Mehta Ka Ulta Chashma' will be again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.